Lokmat Sakhi >Beauty > फक्त १० दिवसांत चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो, ॲक्ने- पिंपल्सचे डागही जातील- बघा जादुई उपाय

फक्त १० दिवसांत चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो, ॲक्ने- पिंपल्सचे डागही जातील- बघा जादुई उपाय

Home Remedies For Amazing Glow On Skin: घरात लवकरच लग्नकार्य असेल तर अगदी आतापासूनच हा उपाय सुरू करा. चेहऱ्यावर खूप सुंदर ग्लो येईल... (home hacks for pimples and acne)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 12:47 PM2024-05-06T12:47:25+5:302024-05-06T12:47:59+5:30

Home Remedies For Amazing Glow On Skin: घरात लवकरच लग्नकार्य असेल तर अगदी आतापासूनच हा उपाय सुरू करा. चेहऱ्यावर खूप सुंदर ग्लो येईल... (home hacks for pimples and acne)

how to get radiant glowing skin in just 10 days, home remedies for amazing glow on skin, home hacks for pimples and acne | फक्त १० दिवसांत चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो, ॲक्ने- पिंपल्सचे डागही जातील- बघा जादुई उपाय

फक्त १० दिवसांत चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो, ॲक्ने- पिंपल्सचे डागही जातील- बघा जादुई उपाय

Highlightsहा उपाय केल्यामुळे अवघ्या १० दिवसांतच त्वचेमध्ये खूप चांगला फरक झालेला जाणवेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेवरचं टॅनिंग खूप जास्त वाढतं. त्यामुळे मग त्वचा थोडी डल दिसू लागते. म्हणूनच त्वचेला पुन्हा हायड्रेटेड करून तिच्यावरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. दररोज नियमितपणे हा उपाय केला तर अवघ्या १० दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल. एवढंच नाही तर त्वचेला इतरही अनेक फायदे होतील (how to get radiant glowing skin in just 10 days). ते फायदे नेमके कोणते आणि हा उपाय कसा करायचा, याविषयीची ही खास माहिती... (home hacks for pimples and acne)

 

त्वचा तरुण, चमकदार ठेवण्यासाठी उपाय

त्वचा छान तरुण, चमकदार राहावी यासाठी कोणता उपाय करायचा, याविषयीची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणारे साहित्य वापरायचे आहे. 

 

 

पांढरेशुभ्र स्नीकर्स मळकट झाले? ३ पदार्थ वापरून काही सेकंदात करा चकाचक, बघा सोपा उपाय

त्यासाठी तर सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे ॲलोव्हेरा जेल घ्या. त्वचेला हायड्रेटेड करण्याचे काम ॲलोव्हेरा जेल खूप चांगल्याप्रकारे करते. त्यामुळे त्वचा अजिबात कोरडी पडत नाही.

ॲलोव्हेरा जेलमध्ये १ चमचा कच्चे दूध टाका. कच्च्या दुधातही त्वचेला हायड्रेटेड करण्याचे आणि त्वचेवर खूप चांगला ग्लो आणण्याचे गुणधर्म असतात.

 

या मिश्रणामध्येच आता १ चमचा बदामाचे तेल आणि १ चमचा मध टाका. बदामाच्या तेलामध्ये असणारे व्हिटॅमिन ई त्वचेला तरुण ठेवते. त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स असतील तर त्या कमी करण्यासाठी बदामाच्या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो. तसेच वरील तिन्ही पदार्थांमधून त्वचेला जे मॉईश्चर मिळते, ते त्वचेमध्ये पकडून ठेवण्याचे काम मध करतो.

घरात लाल मुंग्या, झुरळं झाली? ॲल्यूमिनियम फॉईल घेऊन करा १ उपाय, मुंग्या होतील गायब

अशा ४ पदार्थांचं हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि दिवसातून दोन वेळा या लेपाने चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवून टाका.

हा उपाय केल्यामुळे अवघ्या १० दिवसांतच त्वचेमध्ये खूप चांगला फरक झालेला जाणवेल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

 

Web Title: how to get radiant glowing skin in just 10 days, home remedies for amazing glow on skin, home hacks for pimples and acne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.