Lokmat Sakhi >Beauty > ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक 

ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक 

3 Simple Tips For Office Make up: ऑफिसमध्ये जाण्यासाठी मेकअप करायचा असेल तर तो खूप जास्त ओव्हर, भडक होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची, याविषयी काही टिप्स...(Just 3 steps for formal look makeup)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 07:32 PM2023-12-11T19:32:06+5:302023-12-11T19:32:58+5:30

3 Simple Tips For Office Make up: ऑफिसमध्ये जाण्यासाठी मेकअप करायचा असेल तर तो खूप जास्त ओव्हर, भडक होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची, याविषयी काही टिप्स...(Just 3 steps for formal look makeup)

How to get ready for office, How to do makeup for office, 3 simple tips for office make up, How to do make up for office quickly? Just 3 steps for formal look makeup | ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक 

ऑफिससाठी केलेला मेकअप 'ओव्हर' होऊ नये म्हणून ३ गोष्टी लक्षात ठेवा, मिळेल नॅचरल लूक 

Highlightsमेकअप करताना मात्र तो खूप काळजीपुर्वक करावा लागतो. कारण थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी तुमचा मेकअप 'ओव्हर' वाटू शकतो

हल्ली प्रत्येक क्षेत्रातच आपल्या व्यक्तिमत्त्वाला खूप महत्त्व आलं आहे. पुर्वी तुमच्या दिसण्याकडे, राहणीमानाकडे फार काळजीपुर्वक बघितलं जायचं नाही. पण आता मात्र तुमच्या हुशारीसोबतच तुमचा टापटीपपणा, तुमचे कपडे याकडे लक्ष दिले जाते. म्हणजेच एकंदरीतच तुमचं व्यक्तिमत्त्व पाहिलं जातं. म्हणूनच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी तुम्ही टापटीप असणं, थोडाफार मेकअप करणं गरजेचं आहे. मेकअप करताना मात्र तो खूप काळजीपुर्वक करावा लागतो (How to do makeup for office). कारण थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी तुमचा मेकअप 'ओव्हर' वाटू शकतो (3 simple tips for office make up). म्हणूनच ऑफिसला जाताना एकदम बॅलेन्स मेकअप जमावा (How to get ready for office) यासाठी ३ गोष्टी लक्षात ठेवा..(Just 3 steps for formal look makeup)

 

ऑफिससाठी तयार होताना कसा मेकअप करायचा?

१. मेकअप बेस

ऑफिससाठी जेव्हा मेकअप कराल, तेव्हा मेकअप बेससाठी खूप ग्लॉसी प्रोडक्ट निवडू नका.

पोटावरची चरबर उतरेल झरझर- करून पाहा ५ योगासनं

सगळ्यात आधी चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावून घ्या. नंतर सनस्क्रिन लोशन लावा. त्यानंतर १० मिनिटांनी फाउंडेशनचा हलका थर लावा. कन्सिलर नाही वापरलं तरी चालेल. कारण त्यामुळे कधी कधी चेहरा खूप पॅची दिसतो. फाउंडेशननंतर कॉम्पॅक्ट लावा. गरज वाटली तर हलकासा ब्लश लावा. किंवा नाही लावलं तरी चालेल.

 

२. ओठांचा मेकअप

खूप भडक रंगाच्या, ग्लॉसी लिपस्टिक ऑफिसला जाताना लावू नयेत. ऑफिससाठी कायम न्यूड शेड, मॅट फिनिशिंगच्या लिपस्टिक असाव्या.

थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..

मॅट फिनिशिंगमधली बेबी पिंक किंवा लाईट ब्राऊन लिपस्टिक नेहमीच ऑफिससाठी चांगली वाटते. फक्त लिप लायनर लावून नंतर ओठांवर थोडं फिलिंग केलं तरी चालू शकेल. 

 

३. डोळ्यांचा मेकअप

तुमचा लूक परफेक्ट जमून येण्यासाठी डोळ्यांचा मेकअप अतिशय काळजीपुर्वक करावा लागतो. सगळ्यात आधी तर डोळ्यांना काजळ किंवा आय लायनर लावा.

हिवाळ्यासाठी खास स्किन केअर किट! वेगवेगळे प्रोडक्ट घेण्याची कटकट नकोच... करा स्वस्तात मस्त स्मार्ट खरेदी

काजळ लावण्याची सवय नसेल तर फक्त आयलायनर थोडं ब्रॉड लावलं तरी चालेल. मस्काराचा वापर मात्र आवश्य करा. कारण यामुळे डोळे आणखी खुलतात. आयशॅडो लावायचे असेल तर ते नॅचरल, न्यूड शेडमधलेच निवडा. 

 

Web Title: How to get ready for office, How to do makeup for office, 3 simple tips for office make up, How to do make up for office quickly? Just 3 steps for formal look makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.