Join us  

Diwali Vibes: नटूनथटून ऑफिसला जाताना मेकअप 'ओव्हर' होत नाही ना? ३ टिप्स- दिसाल आकर्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 9:17 AM

Makeup Tips: दिवाळीच्या दिवसात साडी नेसून मेकअप करून ऑफिसला जात असाल तर तुमचा मेकअप थोडा जास्तच तर होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे..(how to get ready for office in Diwali festive season?)

ठळक मुद्दे फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑफिसला तयार हाेऊन जाताना काय  करावं आणि काय टाळावं हे एकदा पाहा..

एरवी आपण फॉर्मल लूकमध्ये ऑफिसला जातो. आपले कपडे आणि मेकअपसुद्धा ऑफिसच्या वातावरणाला शोभेल असेच असतात (Diwali Celebration 2024). पण सणासुदीच्या काळात आणि ते ही दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाचाच थोडा नटण्या-थटण्याचा, नवनविन ट्रॅडिशनल कपडे घालण्याचा मोह होतो. सणासुदीच्या काळात असं नटूनथटून ऑफिसला जायला काहीच हरकत नाही. उलट अशा पेहरावामुळे ऑफिसमध्येही सणाचा उत्साह दिसून येतो. थोडे आनंदी वातावरण तयार होते. पण हे सगळं करताना आपले कपडे,  आपला मेकअप थोडा ओव्हर तर होत नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण असं झालं तर सुंदर, आकर्षक दिसण्याऐवजी आपलं हसू होण्याचीच जास्त शक्यता असते. म्हणूनच फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑफिसला तयार हाेऊन जाताना काय  करावं आणि काय टाळावं हे एकदा पाहा..(how to get ready for office in Diwali festive season?)

 

फेस्टिव्ह सिझनमध्ये ऑफिसला कसं तयार होऊन जावं?

१. कपडे कसे घालावे?

आता सणासुदीच्या दिवसांत ऑफिसमध्ये जाताना तुम्ही अर्थातच नेहमीपेक्षा थोडे वेगळे, ट्रॅडिशनल कपडे घालून जाणार. पण त्या कपड्यांची निवड थोडी काळजीपुर्वक करा.

दिवाळीसाठी 'अशी' सजवा तुमच्या फ्लॅटची बाल्कनी, छोट्याशा जागेत आकर्षक सजावट करण्यासाठी ७ टिप्स

ट्रॅडिशनल कपडे घातले तरी ते खूप भडक रंगाचे नसावे. तसेच खूप वर्क असणारे अतिशय भरजरी नसावे. थोडक्यात सांगायचं तर आपण लग्नकार्यात घालतो, तसे कपडे ऑफिसला जाताना मुळीच घालू नका. 

 

२. मेकअप कसा करावा?

ऑफिसला जाताना मेकअप जरूर करा. पण तो खूप बोल्ड करू नका. एरवी तुम्ही ऑफिसला जाताना जसा मेकअप करता, तसाच मेकअप फेस्टिव्ह सिझनमध्येही करा. ग्लाॅसी मेकअप करणं शक्यतो टाळा.

संध्याकाळी थोडीशी भूक लागते- एनर्जी डाऊन होते? 'या' बिया तोंडात टाका, तब्येतीसाठी खूपच फायदेशीर 

मॅट लूकचा मेकअप नेहमीच आकर्षक आणि सोबर लूक देणारा असतो. डोळ्यांचा मेकअप एरवीपेक्षा थोडा अधिक रेखीव केला तरी चालेल. पण तो सुद्धा भडक होणार नाही, याची काळजी घ्या.  त्याचबरोबर ज्वेलरीची निवड सुद्धा खूप काळजीपुर्वक करा. पारंपरिक प्रकारातले हेवी दागिने घालून ऑफिसला जाणं टाळा. त्याऐवजी इण्डोवेस्टर्न ड्रेसिंगवर चालणाऱ्या ट्रेण्डी दागिन्यांची निवड करा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सदिवाळी 2024स्टायलिंग टिप्सदागिने