Lokmat Sakhi >Beauty > How To Get Rid from Pimples : पिंपल्स, डागांमुळे चेहरा फार खराब झालाय? स्वयंपाकघरातील १ गोष्ट, पिंपल्सला करा बाय

How To Get Rid from Pimples : पिंपल्स, डागांमुळे चेहरा फार खराब झालाय? स्वयंपाकघरातील १ गोष्ट, पिंपल्सला करा बाय

How To Get Rid from Pimples : सुरकुत्या, डाग, निस्तेजपणा यांसारख्या समस्यांसाठी घरगुती उपाय केव्हाही जास्त चांगले, पाहूया कोणत्या उपायांनी काय करायचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 03:55 PM2022-06-28T15:55:50+5:302022-06-28T16:05:57+5:30

How To Get Rid from Pimples : सुरकुत्या, डाग, निस्तेजपणा यांसारख्या समस्यांसाठी घरगुती उपाय केव्हाही जास्त चांगले, पाहूया कोणत्या उपायांनी काय करायचे...

How To Get Rid from Pimples: Pimples, spots on the face is very bad? 1 thing in the kitchen, bye to pimples | How To Get Rid from Pimples : पिंपल्स, डागांमुळे चेहरा फार खराब झालाय? स्वयंपाकघरातील १ गोष्ट, पिंपल्सला करा बाय

How To Get Rid from Pimples : पिंपल्स, डागांमुळे चेहरा फार खराब झालाय? स्वयंपाकघरातील १ गोष्ट, पिंपल्सला करा बाय

Highlightsगुलाबपाण्यात हळद एकत्र करुन चेहऱ्याला लावल्यास उजळपणा वाढण्यास मदत होते. हळद आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

चेहरा हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. चेहऱ्याची त्वचा चांगली असेल तर आपण सहज चांगले दिसतो. पण याच चेहऱ्यावर खूप फोड, डाग किंवा खड्डे असतील, चेहऱ्याची त्वचा रुक्ष झाली असेल तर मात्र आपल्या सौंदर्यात बाधा येते. पिंपल्स ही महिलांना भेडसावणारी अतिशय सामान्य समस्या आहे. कधी त्वचेच्या तेलकटपणामुळे, कधी प्रदूषणामुळे तर कधी आहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे आणि पोट साफ नसल्यामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. एकदा हे पिंपल्स आले की ते कसे घालवायचे असा प्रश्न अनेकांसमोर असतो. मग ते पूर्ण पिकेपर्यंत आणि फुटेपर्यंत वाट पहावी लागते. काही वेळा हे पिंपल्स एकदम फुटले तर काळे डाग पडण्याचीही शक्यता असते. पिंपल्समुळे नंतर चेहऱ्यावर खड्डे पडण्याचीही शक्यता असते. एकूण काय तर पिंपल्स आले की चेहऱ्याची फार वाट लागते आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते(How To Get Rid from Pimples). 

(Image : Google)
(Image : Google)

हळद हा आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा घटक. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन दूर होण्यास हळदीचा अतिशय चांगला उपयोग होतो. बाहेर फिरल्याने आपली त्वचा काळवंडते किंवा निस्तेज होते. सतत पार्लरमध्ये जाऊन फेशियल, ब्लिच करायला आपल्याला जमतंच असं नाही. तर अशावेळी घरच्या घरी हळजीच्या वापराने त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. 

१. हळद आणि चंदन

गुलाब पाणी, मध आणि चंदन पावडर यामध्ये हळद एकत्र करुन त्याचा फेसपॅक करावा. हा पॅक चेहऱ्यावर काही वेळ लावून ठेवावा. यामुळे पिंपल्स तर जातातच पण चेहरा उजळण्यास चांगली मदत होते. आपल्या त्वचेला लिंबाचा रस सूट होत असेल तर पॅक तयार करताना त्यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाचा रस घालावा. हा पॅक झटपट होणारा आणि अतिशय फायदेशीर असल्याने आठवड्यातून दोन वेळा आपण नक्की हा पॅख लावू शकतो. 

२. डाग घालवण्यासाठी दही, बेसन फेसपॅक

पिंपल्स येतात आणि जातात पण त्यामुळे तयार झालेले डाग मात्र बराच काळ चेहऱ्यावर राहतात. या डागांमुळे आपली त्वचा खराब दिसते. हे डाग घालवण्यासाठीही हळद अतिशय उपयुक्त ठरते. एक मोठा चमचा दही, एक चमचा बेसन आणि त्यात अर्धा चमचा हळद घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. १५ मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुतल्यास तुम्हाला फरक दिसून येईल. 

३. सुरकुत्या घालवण्यासाठी 

आपलं वय जसं वाढतं तशा आपल्या चेहऱ्यावर वय वाढल्याच्या खुणा दिसायला लागतात. डोळ्यांखाली किंवा संपूर्ण चेहऱ्यावर सुरकुत्या आल्याने चेहरा विनाकारण वयस्कर दिसतो. पण हळदीच्या वापराने या सुरकुत्यांचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यामुळे आपण तरुण तर दिसूच पण चेहऱ्याचा उजळपणाही वाढण्यास मदत होईल. दिड चमचे दुधात १ चमचा हळद घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यात दूध शोषले जाईपर्यंत मसाज करा. १० मिनीटांनी चेहरा धुवून टाका. 

(Image : Google)
(Image : Google)

४. डार्क सर्कल

डोळ्यांखाली डार्क सर्कल आले की आपण उजळ असलो तरी काळवंडल्यासारखे दिसतो. त्यामुळे ही डार्क सर्कल घालवण्यासाठी तांदळाचे पीठ, टोमॅटोची प्युरी, दूध आणि हळद हे सगळे घटक चांगले एकत्र करुन घ्या. हा पॅक चेहऱ्याला विशेषत: डोळ्यांच्या खाली लावून ठेवा. १५ मिनीटांनी चेहरा धुवून टाकल्यास त्याचा डार्क सर्कल जाण्यास चांगला उपयोग होईल.

५. गोरेपणा वाढवण्यासाठी 

त्वचेचा उजळपणा वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी हळदीचा अतिशय चांगला उपयोग होतो. गुलाबपाण्यात हळद एकत्र करुन चेहऱ्याला लावल्यास उजळपणा वाढण्यास मदत होते. हा उपाय दररोज केला तरी चालतो. याशिवाय हळद आणि गुलाबपाण्यात बेसन घालून याचा फेसपॅक तयार केल्यास त्याचाही चेहऱा उजळण्यास चांगली मदत होते.    

Web Title: How To Get Rid from Pimples: Pimples, spots on the face is very bad? 1 thing in the kitchen, bye to pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.