Join us  

चेहरा सारखा ड्राय होतो? त्वचेतील ओलावा टिकून चेहऱ्यावर ग्लो हवा तर लक्षात ठेवा 4 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 6:18 PM

How To Get Rid from Skin Dryness and Hydrate Skin : नियमित काही गोष्टींचा आपल्या स्कीन केअर रुटीनमध्ये समावेश करणे गरजेचे असते.

ठळक मुद्देत्वचा कोरडी आणि निस्तेज दिसायला लागली की आपण विनाकारण वयस्कर दिसायला लागतो.

प्रत्येकाच्या त्वचेचा रंग वेगळा असतो त्याचप्रमाणे पोतही वेगळा असतो. काहींची त्वचा खूप कोरडी असते तर काहींची खूप तेलकट. तेलकट त्वचेच्या ज्याप्रमाणे पुरळ येणे, सतत चेहऱ्यावर तेलकट थर जमा होणे अशा समस्या असतात त्याचप्रमाणे कोरड्या त्वचेच्याही काही समस्या असतात (Beauty Tips). त्वचा कोरडी पडली की ती निस्तेज दिसायला लागते आणि चेहरा ग्लोइंग दिसत नाही. कोरडी त्वचा थोडी ओढल्यासारखी किंवा सुरकुतलेलीही दिसते. अशावेळी त्वचेचा ग्लो वाढवायचा असेल किंवा त्वचा छान नितळ दिसावी असे वाटत असेल तर त्वचेतील आर्द्रता टिकून ठेवायची असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी (Tips to Hydrate Skin). काळजी घेणे म्हणजे नियमित काही गोष्टींचा आपल्या स्कीन केअर रुटीनमध्ये समावेश करणे होय. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल आणि आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल (How To Get Rid from Skin Dryness) . 

(Image : Google)

१. फेसवॉश निवडताना

आपण वेगवेगळ्या कंपनीचे फेसवॉश चेहरा धुण्यासाठी वापरतो. पण हा फेसवॉश जास्त हार्ष असेल किंवा त्यात जास्त प्रमाणात रासायनिक घटकांचा समावेश केला असेल तर त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा रुक्ष किंवा कोरडी व्हायला लागते. अशावेळी फेसवॉशऐवजी क्लिंजर वापरलेला केव्हाही जास्त चांगला. क्लिंजरमुळे त्वचेला एकप्रकारचे मॉइश्चर तर मिळतेच पण त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

२. टोनर आवश्यकच

आपण मॉइश्चरायजर नियमित वापरतो पण टोनरचा वापर आपण करत नाही. काही वेळा घाम, धूळ यांमुळे आपल्या त्वचेची रंध्रे बंद झालेली असतात. अशावेळी त्यावर मॉइश्चरायजर लावल्यास त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही. पण टोनर लावल्यास बंद झालेली रंध्रे उघडी होतात. त्यामुळे मॉइश्चरायजर त्वचेत चांगल्या पद्धतीने मुरते आणि त्वचा ग्लो करण्यास मदत होते. 

(Image : Google)

३. पाणी पिण्याचे प्रमाण 

आपण दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या धावपळीत असतो. अशावेळी अनेकदा आपल्याला जेवायला किंवा खायलाही नीट वेळ होत नाही. मग पाणी पिणे तर दूरच. मात्र कितीही घाईगडबड असली तरी भरपूर पाणी पिणे ज्याप्रमाणे आरोग्यासाठी चांगले असते, त्याचप्रमाणे त्वचेचे सौंदर्य टिकून राहावे यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. पाण्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते. 

४. सनस्क्रीन 

घराबाहेर पडताना आवर्जून सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सूर्याच्या अतिनील किरणांचा त्वचेवर विपरित परीणाम होतो आणि त्वचा कोरडी पडते. मात्र ३० किंवा त्याहून जास्त एसपीएफ असणारे सनस्क्रीन वापरल्यास टॅनिंग आणि हायड्रेशनपासून त्वचेचे संरक्षण होते आणि त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी