Lokmat Sakhi >Beauty > How to get rid from white hair : पांढरे केस दिवसेंदिवस वाढत चाललेत? काळेभोर, दाट केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

How to get rid from white hair : पांढरे केस दिवसेंदिवस वाढत चाललेत? काळेभोर, दाट केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

How to get rid from white hair : डोक्यावर काळे कमी पांढरे केस जास्त झालेत? काळेभोर केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 02:18 PM2022-03-06T14:18:27+5:302022-03-06T14:21:56+5:30

How to get rid from white hair : डोक्यावर काळे कमी पांढरे केस जास्त झालेत? काळेभोर केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

How to get rid from white hair : white hair to hair fall tulsi patta and myrobalan removes many hair problems know way to use | How to get rid from white hair : पांढरे केस दिवसेंदिवस वाढत चाललेत? काळेभोर, दाट केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

How to get rid from white hair : पांढरे केस दिवसेंदिवस वाढत चाललेत? काळेभोर, दाट केस मिळवून देतील स्वयंपाक घरातील २ पदार्थ

पांढरे केस काळे करण्यासाठी आजकाल विविध उत्पादने आली आहेत. अशा उत्पादनांचा वापर करून केस तर काळे करता येतात. पण केमिकल्स केसांना लावल्यामुळे केसांचं गळणं, केस कोरडे होणं अशा तक्रारींमध्ये वाढ होते.  अनेकांना नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतात. तुळशी आणि आवळा या दोन्हींचा वापर करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने पांढरे होणारे केस काळे करू शकता. (Hair Care Tips) तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात.

यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. याशिवाय  कमीत कमी वेळात तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे दिसतील.  (white hair to hair fall tulsi patta and myrobalan removes many hair problems)

तुळस आणि आवळ्याचा वापर

तुळस आणि आवळा देखील पांढरे केस पुन्हा काळे ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तुळस बारीक करून त्यात आवळा पावडर मिसळा आणि थोड्या पाण्यात भिजवून रात्रभर सोडा. सकाळी आंघोळ करताना या द्रावणाने केस धुवा. केस नैसर्गिकरित्या काळे ठेवण्यासाठी हा उपाय काही महिने वापरणे फायदेशीर ठरू शकते.

आवळा आणि तुळशीची पेस्ट

जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील तर आवळा आणि तुळशीची पाने बारीक करून पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट एक कप पाण्यात विरघळवून केसांच्या मुळांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर केस ताज्या पाण्याने धुवा. लवकरच तुमचे केस काळे होऊ लागतील.

चमकदार केसांसाठी आवळा

केसांना चमक आणण्यासाठी तुम्ही आवळा वापरू शकता. केसांना चमक आणण्यासाठी आवळ्याच्या रसाने चांगली मसाज करा. यानंतर तासाभरानंतर केस ताज्या पाण्याने धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येईल. आवळा हे एक प्रकारचे औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.

केस गळणे थांबवण्यासाठी आवळ्याच्या तेलाने केसांना मसाज करा. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात जे केसांच्या रोमांना मजबूत करतात, तर आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केस काळे होण्यास मदत करते. आवळा आणि मेंदी पावडरचे मिश्रण लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात. त्यात लोह आणि कॅरोटीन देखील जास्त प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

 

Web Title: How to get rid from white hair : white hair to hair fall tulsi patta and myrobalan removes many hair problems know way to use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.