Lokmat Sakhi >Beauty > चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

How to Get Rid of a Dark Neck: 2 best remedies of Coconut oil : महागडे क्रीम्स-पार्लरचा खर्च टाळा, खोबरेल तेल घ्या त्यात १ वस्तू मिसळा, मान होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 02:44 PM2023-11-21T14:44:56+5:302023-11-21T14:45:38+5:30

How to Get Rid of a Dark Neck: 2 best remedies of Coconut oil : महागडे क्रीम्स-पार्लरचा खर्च टाळा, खोबरेल तेल घ्या त्यात १ वस्तू मिसळा, मान होईल स्वच्छ

How to Get Rid of a Dark Neck: 2 best remedies of Coconut oil | चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

चेहरा सुंदर (Glowing face) दिसावा यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. विविध महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करतो. शिवाय पार्लरमध्ये अवाजवी खर्च होतो तो वेगळाच. पण चेहऱ्याव्यतिरिक्त कधी मानेकडे लक्ष आपण दिलं आहे का? अनेकदा मान काळवंडते (Dark neck). शिवाय हाताचे कोपरे आणि गुडघेही काळवंडतात. ज्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते.

यासाठी चेहऱ्यासह अन्य अवयवांच्या त्वचेकडेही लक्ष द्यायला हवे. विशेषतः मानेची त्वचा. मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी आपण पार्लरमध्ये खर्च करतो, पण पार्लरचा खर्च वाचवायचा असेल, शिवाय केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर टाळायचा असेल तर, काही घरगुती उपाय करून पाहा. यामुळे नक्कीच काही दिवसात फरक दिसेल(How to Get Rid of a Dark Neck: 2 best remedies of Coconut oil).

मानेवरचा काळपटपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय(Tips to get rid of Dark neck)

खोबरेल तेल - लिंबाचा रस

खोबरेल तेल फक्त केसांसाठी नसून, त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. खोबरेल तेलातील गुणधर्म मानेवरचा काळपटपणा दूर करण्यास मदत करेल. यासाठी एका वाटीत समप्रमाणात खोबरेल तेल आणि लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट मानेवर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. १० मिनिटानंतर मान पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा या पेस्टचा वापर केल्याने काही दिवसात मानेवर फरक दिसेल.

रोज सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवा, दिसतील ४ सुंदर फरक, चिरकाळ टिकून राहील तारुण्य

खोबरेल तेल - एलोवेरा जेल

खोबरेल तेल आणि एलोवेरा जेलचा वापर मानेवरचा काळपटपणा, हाताचे कोपरे आणि गुडघ्यांवरील काळपटपणा दूर करण्यास मदत करते. यासाठी एका वाटीत समप्रमाणात खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मानेवर रात्रभरासाठी लावून ठेवा. सकाळी पेस्ट पाण्याने धुवून काढा.

इतर उपाय

- बटाट्याच्या वापराने मानेवरचा काळपटपणा निघून जाईल. यासाठी एका वाटीत बटाट्याचा रस घ्या, त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार पेस्ट कॉटन बॉलच्या मदतीने मानेवर लावा. १५ मिनिटानंतर पाण्याने पेस्ट धुवून काढा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने मानेवरचा काळपटपणा निघून जाईल.

डार्क सर्कलमुळे सतत मेकअप करावा लागतो? ३ घरगुती उपाय, मेकअप न करताही दिसाल सुंदर

- बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी नसून, मानेवरचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका वाटीत २ चमचे बेकिंग सोडा घ्या त्यात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. हाताने किंवा कॉटन बॉलच्या मदतीने पेस्ट मानेवर लावा. १० मिनिटानंतर ओल्या कापडाने पेस्ट पुसून काढा. बेकिंग सोडा मान तर साफ करेलच शिवाय डेड स्किन सेल्सही दूर करेल.

Web Title: How to Get Rid of a Dark Neck: 2 best remedies of Coconut oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.