Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात डोक्यातून खूप कुबट वास येतो? १ उपाय - केसांमधली दुर्गंधी जाईल-कोंडाही होणार नाही

उन्हाळ्यात डोक्यातून खूप कुबट वास येतो? १ उपाय - केसांमधली दुर्गंधी जाईल-कोंडाही होणार नाही

How To Get Rid Of Bad Smell From Scalp: उन्हाळ्याच्या दिवसांत केसांमधून खूपच कुबट वास येतो. केसांमधला हा दुर्गंध घालविण्यासाठी करून बघा १ सोपा उपाय...(summer special beauty tips)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2024 03:26 PM2024-04-01T15:26:55+5:302024-04-01T15:31:49+5:30

How To Get Rid Of Bad Smell From Scalp: उन्हाळ्याच्या दिवसांत केसांमधून खूपच कुबट वास येतो. केसांमधला हा दुर्गंध घालविण्यासाठी करून बघा १ सोपा उपाय...(summer special beauty tips)

How to get rid of bad smell from scalp in summer? home remedies for odour from hair and scalp, benefits of scalp massager | उन्हाळ्यात डोक्यातून खूप कुबट वास येतो? १ उपाय - केसांमधली दुर्गंधी जाईल-कोंडाही होणार नाही

उन्हाळ्यात डोक्यातून खूप कुबट वास येतो? १ उपाय - केसांमधली दुर्गंधी जाईल-कोंडाही होणार नाही

Highlightsकेसांमधली दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा.

केस धुवून जास्त दिवस झाले तर डोक्यातून एक प्रकारचा कुबट वास यायला लागतो. हिवाळ्यात- पावसाळ्यात या दुर्गंधाचं प्रमाण कमी असलं तरी उन्हाळ्यात मात्र हा त्रास खूपच वाढतो. डोक्याच्या त्वचेतून लगेचच दुर्गंध येऊ लागतो. यासाठी आपण केस वारंवार धुतो. पण त्याचाही विशेष परिणाम दिसून येत नाही (How to get rid of bad smell from scalp in summer?). म्हणूनच आता हा एक उपाय करून पाहा (home remedies for odour from hair and scalp). हा उपाय केल्यामुळे स्काल्प स्वच्छ होऊन केसांमधली दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते. ( benefits of scalp massager)

डोक्यातून दुर्गंधी येत असल्यास उपाय

 

डोक्यातून किंवा केसांमधून घाणेरडा वास येत असल्यास कोणता उपाय करावा, या विषयीचा व्हिडिओ urmilanimbalkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

घरगुती हेअर डाय बनविण्याची आजीबाईंची खास पद्धत- बघा पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय

हा उपाय करण्यासाठी बाजारात विकत मिळणारे रबरी स्काल्प मसाजर वापरावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.

शाम्पू लावल्यानंतर स्काल्प मसाजरने स्काल्पला काही सेकंदासाठी हळूवार मसाज करा आणि त्यानंतर केस धुवून टाका. यामुळे स्काल्पला चिकटलेली सगळी घाण निघून जाईल, जेणेकरून डोक्यातून दुर्गंध येणार नाही, असं सांगण्यात आलं आहे.

 

हे उपायही करून पाहा

केसांमधली दुर्गंधी कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा.

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात? बघा खास टिप्स, चमकदार पांढरे होतील चिप्स- वर्षभर टिकतील

१. मध आणि लिंबाचा रस हे दोन्ही पदार्थ सम प्रमाणात एकत्र करा. या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेला मालिश करा आणि अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. डोक्यातली दुर्गंधी कमी होईल.

२. केस धुण्याच्या अर्धा ते पाऊण तास आधी केसांच्या मुळाशी गुलाब पाणी लावून ठेवा. यामुळेही केसांमधली दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. 


 

Web Title: How to get rid of bad smell from scalp in summer? home remedies for odour from hair and scalp, benefits of scalp massager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.