महिलांना आपल्या हाता-पायांच्या काळेपणाचा खूप त्रास होतो. भांडी धुताना आणि इतर कामं करतात हात साफ होतात. पण जमीनिवर राहिल्यामुळे पायांना घाण, धूळ चिकटते. ज्यामुळे पाय काळे दिसू लागतात. याशिवाय चप्पल, सॅण्डल वापरल्यामुळे पायांमध्ये टॅनिंग दिसून येते. जी अनेकदा घासूनही दिसत नाही. म्हणून काही घरगुती उपाय केले तर पायांचा काळेपणा दूर होईल. शॅम्पूच्या पाकीटात ३ पदार्थ मिसळून एकत्र करा नंतर याचा वापर करा. हे ३ पदार्थ पायांना कसे लावावेत पाहूया. (How To Get rid of black legs with just Rs 1 shampoo)
हात-पाय जास्त काळे का पडतात?
प्रदूषण आणि सुर्याच्या किरणांमध्ये जास्त राहिल्यानं पायांवर टॅनिंग येऊ लागतं. म्हणूनच स्किनचा टोन अन इव्हन दिसतो. याव्यतिरिक्त दिवसभराच्या धावपळीमुळे पायांवर घाण-धूळ जमा होते ज्यामुळे पायांमुळे काळपटपणा येतो. याचे मुख्य कारण म्हणजे मेलेनिनचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्वचा काळी होते.
पायांची क्रिम बनवण्यासाठी लागणारं साहित्य
1) कोलगेट - अर्धा चमचा
२) लिंबू- २ चमचे
३) बेकिंग सोडा - १ चमचा
४) शॅम्पू- १ पाकीट
सगळ्यात आधी एक शॅम्पूचं पाकीट घेऊन वरून कापून घ्या. नंतर पाकीटात अर्धा चमचा कोलगेट, २ चमचे लिंबू आणि १ चमचा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण आपल्या पायांना लावून ठेवा आणि पंज्यांपासून टाचेपर्यंत पसरवा. १० मिनिटं तसंच लावलेलं राहू द्या.
दिवाळीत मुलांसह काढा १० सोप्या कार्टून रांगोळ्या; मुलांनाही शिकवा रांगोळी काढण्यातली गंमत
वेळ पूर्ण झाल्यानंतर ओल्या कापडानं पाय साफ करून घ्या. तुम्हाला दिसेल की पायांचा काळेपणा दूर झाला आहे आणि रंग एकदम स्वच्छ झाला आहे. आठवड्यातून २ वेळा किंवा ३ ते ४ दिवसांच्या गॅपनं तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे पाय सुंदर दिसतील.
टॅनिंग काढून टाकण्यासाठी लिंबाचा वापर
लिंबात व्हिटामीन सी असते. ज्यात स्किन व्हाईटनिंग फॅक्टर असतो याशिवाय टॅनिंग आणि डेड स्किन सेल्स साफ होण्यास मदत होते. जर तुमचे कोपर आणि गुडघे काळे पडत असतील तर तुम्ही लिंबाची सालं थेट त्यावर घासू शकता. ज्यामुळे बरेच फायदे मिळतील.
दिवाळी वजन वाढू नये म्हणून 'हे' काम करा; तळलेले, गोड पदार्थ खाऊन कणभर वजन वाढणार नाही
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यात ब्लिचिंग गुण असतात ज्यामुळे डाग निघून जाण्यास मदत होते. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यांना लावा. लिंबू आणि बेकिंग सोड्याचा एकत्र वापर केल्यास त्वचेचा काळेपणा दूर होण्यास मदत होईल.