समोरच्या व्यक्तीवर आपली सगळ्यात पहिली छाप पडते ती आपला चेहरा पाहूनच. त्यानंतर मग आपले कपडे, एकंदरीत सगळा गेटअप, आपलं ज्ञान या गोष्टी तपासल्या जातात. पण सगळ्यात आधी समोरच्याला दिसतो तो आपला चेहरा. त्यामुळे आपण नेहमी छान राहावं, छान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यातही महिलांना तर जरा जास्तच (how to get rid of blackheads and whiteheads). अर्थात यात काहीही चूक नाही. पण नेमकं काय होतं की आपल्या सगळ्या कामांमध्ये आपण एवढे अडकून जातो की चेहऱ्याची, त्वचेची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे मग बऱ्याचदा चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढतात. (home remedies for removing blackheads and whiteheads)
नाकावर, हनुवटीवर, ओठांच्या दोन्ही बाजुंच्या कोपऱ्यावर बऱ्याचदा तर गालाच्या नाकाजवळच्या भागावरही ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स दिसतात. त्यामुळे मग साहजिकच चेहरा खराब होऊ लागतो. त्वचेखालच्या भागात जे तेल किंवा सेबम तयार हाेतं ते त्वचेवर असणाऱ्या रंध्रांमधून म्हणजेच बारीक छिद्रांमधून बाहेर येतं.
श्रावणात एकदाच जेवणाचे व्रत करताय? 'या' पद्धतीने करा उपवास, वजन घटेल- मिळतील ५ फायदे!
त्याची जेव्हा बाहेरच्या हवेशी रिॲक्शन होते, तेव्हा ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स तयार होतात. मुळात जर त्वचेखालच्या भागात सेबमची निर्मिती जास्त होऊ द्यायची नसेल तर त्यासाठी कोणते नैेसर्गिक उपाय करावे, याविषयीची माहिती merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बार्लीचं पाणी पिणे. यासाठी २० ग्रॅम बार्ली २ लीटर पाण्यात रात्रभर टाकून ठेवा. त्यानंतर सकाळी ते पाणी उकळायला ठेवा. उकळून पाणी जेव्हा अर्धे होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि दिवसभरात थोडे थोडे करून प्या. यामुळे शरीरातील सेबम निर्मिती नियंत्रित होते.
ब्रेस्टफिडींग करणाऱ्या आईने खावेत ५ पदार्थ, पाठ- कंबर गळून जाणार नाही- राहाल फ्रेश, आनंदी
२. तसेच एका वाटीमध्ये बार्ली, ज्वारी आणि तांदळाचे पीठ सम प्रमाणात घ्या. त्यात दही किंवा दूध घालून ते कालवा. हा लेप चेहऱ्याला लावून मसाज करा. आणि काही वेळाने चेहरा धुवून टाका. ब्लॅकहेड्स कमी होण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा.