Join us  

चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स- व्हाईटहेड्स खूप वाढले? टोमॅटो फेशियल करा, चेहरा चमकेल चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 2:11 PM

How To Do Tomato Facial At Home: ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स खूप वाढल्याने चेहरा खराब दिसत असेल किंवा थंडीमुळे त्वचा कोरडी पडली असेल तर हा एक घरगुती उपाय करून पाहा...(How to get rid of blackheads and whiteheads?)

ठळक मुद्देसगळ्यात आधी चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे वाफ द्या. त्यानंतर पुढील स्टेप्स करून टोमॅटो फेशियल करा. त्वचा छान नितळ, स्वच्छ, चमकदार दिसेल. 

अनेक जणींच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स खूप दिसतात. काही जणींना फक्त व्हाईट हेड्सचा त्रास असतो तर काही जणींना ब्लॅकहेड्सचा त्रास असतो. खासकरून नाक, खालच्या ओठांच्या खालचा भाग, ओठांच्या दोन्ही बाजूंच्या कडा याठिकाणी व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स जास्त प्रमाणात दिसून येतात (How to get rid of blackheads and whiteheads?). यामुळे मग चेहऱ्याचे सौंदर्यच जाते. म्हणूनच चेहऱ्यावरचे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी घरच्याघरी टोमॅटो फेशियल करून पाहा (how to do tomato facial at home). हा उपाय केल्याने त्वचा स्वच्छ तसेच चमकदार होईल. (4 steps tomato facial for glowing skin)

घरच्याघरी टोमॅटो फेशियल कसं करायचं?

 

स्वच्छ चमकदार त्वचा मिळविण्यासाठी घरच्याघरी टोमॅटो फेशियल कसं करायचं, याविषयीचा व्हिडिओ diybyshikha या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

यामध्ये घरगुती साहित्य वापरून फक्त ३ स्टेप्समध्ये टोमॅटो फेशियल कसं करायचं ते सांगितलं आहे. खासकरून व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी जेव्हा आपण हा उपाय करतो, तेव्हा सगळ्यात आधी चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे वाफ द्या. त्यानंतर पुढील स्टेप्स करून टोमॅटो फेशियल करा. 

 

स्टेप १ 

सगळ्यात आधी तर एखाद्या मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या ३ आडव्या स्लाईस करून घ्या. आता यापैकी एका स्लाईसवर साखर टाका आणि त्याने चेहऱ्याला गोलाकार दिशेत मसाज करा. सुरुवातीला आपण वाफ घेतली आणि त्यानंतर हे स्क्रब करतो आहोत. त्यामुळे व्हाईटहेड्स, ब्लॅक हेड्स तर निघून जातीलच, पण डेड स्किनही निघून जाईल.

ज्वारीची, नाचणीची की गव्हाची? कोणती चपाती खाणं अधिक चांगलं? बघा या प्रश्नाचं नेमकं उत्तर 

स्टेप २

यासाठी टोमॅटोची दुसरी स्लाईस घ्या. त्यावर मध टाका आणि त्या स्लाईसने चेहऱ्याला गोलाकार मालिश करा. मध आणि टोमॅटो यांच्यातील घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा मऊ होण्यास मदत होईल.

 

स्टेप ३

यामध्ये आपल्याला कॉफीचा वापर करायचा आहे. टोमॅटोच्या एका स्लाईसवर कॉफी पावडर टाका आणि त्याने चेहऱ्याला ३ ते ४ मिनिटे मसाज करा.

लग्नसराईसाठी ठुशी घ्यायची? बघा १ ग्रॅम ठुशीचे पारंपरिक तसेच लेटेस्ट फॅशनचे सुंदर डिझाईन्स

यानंतर ४ ते ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर माॅईश्चरायझर लावा. त्वचा छान नितळ, स्वच्छ, चमकदार दिसेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी