Join us

५ मिनिटांत ब्लॅकहेड्स निघून जातील; लिंबू आणि दह्याचे उपाय, ब्लॅकहेड्स काढताना दुखणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 19:11 IST

How to Get Rid of Blackheads on Nose : ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया.

रोज प्रदूषण, धूळीच्या संपर्कात आल्यामुळे  चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येण्याची समस्या उद्भवते.  ब्लॅकहेड्स त्वचेवर डागांप्रमाणे दिसून येतात. हेअर फॉलिकल्स ब्लॉक झाल्यामुळे असं दिसून येते. ब्लॅकहेड्स पिंपल्सप्रमाणे दिसतात. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अनेक केमिकल्सयुक्त उत्पादनं बादारात उपलब्ध आहेत. (How to Get Rid of Blackheads on Nose) पण त्यांच्या वापराचा त्वचेवर पुरेपूर फायदा दिसून येत नाही. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. (Simple Ways to Remove Blackheads from Your Nose)

ब्लॅकहेड्स का येतात?

जास्तीत जास्त लोकांना नाकाववर ब्लॅकहेड्स दिसतात. तर काहींना मान, पाठ, छाती, मानेवर आणि हातांवर येतात. अमेरिकन एकेडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार हा एक त्वचेचा विकार आहे. त्वचेवर जास्त घाण जमा झाल्यामुळे तर कधी हार्मोनल बदलांमुळे ब्लॅकहेड्स दिसतात. ब्युटी प्रोडक्ट्सचा जास्त वापर करणं, मासिक पाळी, गर्भावस्था, गर्भनिरोधक गोळ्या घेणं. पीसीओडी, जास्त ताण घेणं, स्टेरॉईड्सचं अतिसेवन यांमुळे ब्लॅकहेड्स येतात.

उपाय

१) सगळ्यात आधी एका वाटीत दही, मीठ, हळद, साखर, लिंबू घाला. या पदार्थांची पेस्ट एकत्र करून नाकावर आणि हनुवटीवर लावा. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकहेड्स जास्त दिसतात तिथे  हे मिश्रण लावा. नंतर लिंबाने हनुवटी आणि नाकावर हळूवार घासा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्यास तुम्हाला चेहऱ्यामध्ये बदल झालेला दिसेल.

२) एक कप साखरेत ४ मोठे चमचे जोजोबा ऑईल व्यवस्थित मिसळा. यात साखर व्यवस्थित मिसळायला हवी. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून गोलाकार मालिश करा. मालिश केल्यानंतर ठंड पाण्याने चेहरा धुवून मॉईश्चराईजर लावा. आवठड्यातून ३ वेळा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

३) सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पाणी गरम करून त्यात मध घाला. हे मिश्रण ब्लॅकेड्टसवर १० मिनिटं लावून तसंच ठेवा. त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या कापडानं नाकाचं मधाचं मिश्रण पुसा. 

4)  एका भांड्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळून पेस्ट बनवा. हे पेस्ट  ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा धुवून मॉईश्चरायजर लावा. चांगला परिणामांसाठी रोज हा उपाय करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी