बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की आपण चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेतो, पण त्या तुलनेत शरीराच्या इतर अवयवांकडे मात्र दुर्लक्ष करतो. त्यातल्या त्यात तर मान, पाठ, हाताचे कोपरे आणि गुडघे या भागांकडे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग त्या भागावरची डेड स्किन, टॅनिंग वाढत जाते आणि हे भाग इतर अवयवांपेक्षा जरा जास्त काळे दिसू लागतात. त्यांच्यावरचं टॅनिंग खूप वाढलेलं असेल तर ते स्वच्छ करणं हे मोठं कठीणच काम होऊन जातं (How to get rid of blackness from neck and back). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा. हा उपाय केल्याने टॅनिंग, डेड स्किन निघून त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. (home remedies for removing tanning on neck, back, elbow and knee area)
मानेवरचं, पाठीवरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी उपाय
काळवंडलेली मान- पाठ, गुडघे, हाताचे कोपरे स्वच्छ कसे करायचे, याचा उपाय beauty__secrets_with_shalini या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कोटिंग खराब न होऊ देता बघा कसं स्वच्छ करायचं सॅण्डविच मेकर, ग्रिलर- काही सेकंदातच चकाचक
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो, १ टीस्पून कॉफी पावडर, १ टीस्पून हळद, १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल आणि १ टीस्पून बेसन पीठ लागणार आहे.
सगळ्यात आधी तर टोमॅटो अर्धा कापून घ्या. आता कापलेल्या टोमॅटोच्या फोडीच्या आतल्या भागावर चाकूने अगदी वर-वर असे उभे- आडवे चरे पाडा.
यानंतर या फोडीवर बेसन पीठ, कॉफी पावडर, हळद, ॲलोव्हेरा जेल टाका आणि आता हा टोमॅटो थेट पाठीला लावून त्याने पाठ, मान घासा.
हा उपाय करण्याच्या आधी एक टॉवेल गरम पाण्यात बुडवा. टॉवेल पिळून घ्या आणि तो पाठीवर ७ ते ८ मिनिटांसाठी ठेवा. यानंतर टाेमॅटोने वरीलप्रमाणे स्क्रबिंग करा.
स्मरणशक्ती वाढून मुलांचा मेंदू होईल तल्लख, ५ सोपे ब्रेन गेम- मुलांना शिकवा आणि तुम्हीही करा
आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास लवकरच खूप चांगला परिणाम दिसून येईल.
मान- पाठ खूपच जास्त काळवंडली असेल तर टोमॅटोवर थोडा लिंबाचा रसही टाकावा. लहान मुलांसाठी हा उपाय करत असाल तर तो आठवड्यातून एकदाच करा.