Join us  

घामामुळे अंगाला घाण वास येतो, परफ्यूम- डिओ लावूनही दुर्गंधी लपेना? ३ सोपे उपाय- राहा फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 12:11 PM

How To Get Rid Of Body Odour In Summer: उन्हाळ्यात घाम खूप येत असल्याने अंगाला दुर्गंधी येते.. म्हणूनच हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. घाम कमी होईल...

ठळक मुद्देअंगाची दुर्गंधी आणि येणारा घाम यांचे प्रमाण नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी आणि दिवसभर छान फ्रेश राहण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा...

उन्हाळ्याच्या दिवसांत खूप जास्त घाम घाम होतो. अगदी घरात बसलेलं असतानाही घामाच्या धारा लागतात. बऱ्याचदा तर पंख्याचं वारंही एवढं गरम असतं की त्यामुळेही येणारा घाम कमी होत नाही. कामानिमित्त घराबाहेर जावं लागतं अशा लोकांना येणारा घाम आणि त्यामुळे येणारा दुर्गंध तर विचारायलाच नको... अगदी परफ्यूम किंवा डिओ लावूनही उपयोग होत नाही. या दुर्गंधीमुळे मग चारचौघांत उगाच अवघडल्यासारखं होतं (How to get rid of body odour in summer?). म्हणूनच अंगाची दुर्गंधी आणि येणारा घाम यांचे प्रमाण नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी आणि दिवसभर छान फ्रेश राहण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा... (home remedies for reducing sweating and body odour)

उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून उपाय

 

१. तुरटी

उन्हामुळे होणारा घाम- घाम आणि त्यामुळे अंगाचा येणारा दुर्गंध हे दोन्ही कमी करायचे असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवा.

आपल्या मुलांनी गुणी, समजूतदार व्हावं असं वाटतं ना? मग ५ गोष्टी त्यांना नक्की शिकवा

तसेच काखेमध्ये, गळ्यावर, मानेवर अशा जास्त घाम येणाऱ्या भागांवरही तुरटी फिरवा. यामुळे त्या ठिकाणचे बॅक्टेरिया बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि घाम येण्याचे प्रमाणही कमी होते.

 

२. लिंबू

लिंबू हा देखील घाम आणि त्यामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे. यासाठी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एका लिंबाचा रस पिळून टाका.

केस वाढतच नाहीत? 'हे' जादुई तेल लावा, एवढे लांबसडक होतील की सांभाळणंही कठीण होईल...

तसेच त्या पाण्यात काेणत्याही इसेंशियल ऑईलचे काही थेंब टाका. लिंबू पाण्यात पिळल्यानंतर त्याचे जे सालपट आहे त्याने काखेत, मानेवर, गळ्यावर मसाज करा. ५ ते ७ मिनिटांनी स्वच्छ आंघोळ करून टाका...

 

३. या गोष्टींकडेही लक्ष द्या..

कांदा, लसूण, ब्रोकोली, पत्ताकोबी या सल्फरयुक्त भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने अंगाला जास्त दुर्गंध येतो. त्यामुळे उन्हाळ्यात या भाज्यांचे सेवन थोडे कमी करा.

केसांना कधी गुळाचं पाणी लावून पाहिलं का? बघा केसांच्या सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय.....

थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा. रोज स्वच्छ तसेच सुती आणि सैलसर कपडे घाला. यामुळेही अंगाची दुर्गंधी बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीसमर स्पेशल