Lokmat Sakhi >Beauty > केसांत खूपच कोंडा झाला- डोक्यात सतत खाज येते? केस धुण्याच्या आधी फक्त १ काम करा- कोंडा कमी होईल

केसांत खूपच कोंडा झाला- डोक्यात सतत खाज येते? केस धुण्याच्या आधी फक्त १ काम करा- कोंडा कमी होईल

Hair Care Tips: थंडी वाढली की केसांतला कोंडा वाढतो, डोक्यात सारखी खाज येऊ लागते (dandruff and itchy scalp). म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय (Home remedies) करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 03:19 PM2023-11-17T15:19:50+5:302023-11-17T15:21:46+5:30

Hair Care Tips: थंडी वाढली की केसांतला कोंडा वाढतो, डोक्यात सारखी खाज येऊ लागते (dandruff and itchy scalp). म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय (Home remedies) करून पाहा..

How to get rid of dandruff and itchy scalp, How to treat itchy scalp at home, Home remedies for dandruff and itchy scalp | केसांत खूपच कोंडा झाला- डोक्यात सतत खाज येते? केस धुण्याच्या आधी फक्त १ काम करा- कोंडा कमी होईल

केसांत खूपच कोंडा झाला- डोक्यात सतत खाज येते? केस धुण्याच्या आधी फक्त १ काम करा- कोंडा कमी होईल

Highlightsआठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा. नियमितपणे केल्यास अगदी पंधरा दिवसांतच खूप चांगला फरक दिसून येईल. 

वातावरणात थंडी जाणवू लागली की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम त्वचेवर दिसून येतो. थंडीमुळे डोक्यातली त्वचा म्हणजेच स्काल्पही कोरडी होऊ लागते. यामुळे मग केसांत कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचदा तर कोंडा एवढा वाढतो की गडद रंगाचे कपडे घातल्यावर तो खांद्यावर पडलेला दिसतो. किंवा थोडासा जरी भांग बदलला तरी लगेच दिसून येतो. कोंडा खूप झाला तर डोक्यात सारखी खाज येते (How to get rid of dandruff and itchy scalp). चारचौघांत डोकं खाजवायला अगदी नकोसं होतं (How to treat itchy scalp at home). म्हणूनच हा सगळा त्रास कमी करायचा असेल तर केस धुण्याच्या १ तास आधी हा एक सोपा उपाय करा (Home remedies for dandruff and itchy scalp)...

 

केसांतला कोंडा कमी करण्यासाठी उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या satinder.mutneja या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

घरात सतत झुरळं होतात? ५ गोष्टी न विसरता करा, घरात कधीच झुरळं होणार नाहीत

हा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल, कांद्याचा रस आणि लिंबाचा रस या ३ गोष्टी लागणार आहेत.

सगळ्यात आधी तर कांदा मिक्सरमधून फिरवून घ्या किंवा किसून घ्या आणि त्याचा रस काढा.

 

एका वाटीत २ टेबलस्पून खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ ते दिड टेबलस्पून कांद्याचा रस आणि १ टीस्पून लिंबाचा रस टाका. लिंबाच्या रसामुळे कोंडा आणि डोक्यातली खाज कमी होते. तर कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ चांगली होते. 

'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि आंघोळीच्या १ तास आधी केसांच्या मुळांशी लावा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही या मिश्रणातले घटक कमी- जास्त करू शकता. १ तासानंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाका.

आठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा. नियमितपणे केल्यास अगदी पंधरा दिवसांतच खूप चांगला फरक दिसून येईल.

 

Web Title: How to get rid of dandruff and itchy scalp, How to treat itchy scalp at home, Home remedies for dandruff and itchy scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.