शरीरात पोषणमुल्यांची कमतरता असेल, रात्रीची झोप पुर्ण होत नसेल, स्क्रिन टाईम खूप जास्त असेल तर अशा काही कारणांमुळे डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स दिसू लागतात (How to get rid of dark circles?). जेव्हा आपण पार्लरमध्ये जाऊन आयब्रो करतो, तेव्हा तर डार्क सर्कल्स आणखीनच प्रकर्षाने जाणवू लागतात. त्यात रंग गोरा असेल तर डार्क सर्कल्सची समस्या जरा जास्तच जाणवते. डार्क सर्कल्स घालविण्यासाठी आपल्या आहारात तर काही बदल केलेच पाहिजेत (1 simple home remedy for removing dark circles), पण त्यासोबतच हा एक घरगुती उपायही करून पाहा. दिवाळीपर्यंत नक्कीच डार्क सर्कल्स कमी होतील..
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काकडी, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि ऑलिव्ह ऑईल या चार गोष्टी लागणार आहेत.
दिवाळीला पाण्याखालची रांगोळी काढण्याची बघा १ खास ट्रिक- करा सुंदर डेकोरेशन- घर सजेल सुंदर
सगळ्यात आधी तर काकडी किसून तिचा रस काढून घ्या. हा रस साधारण १ टेबलस्पून असावा. त्या रसामध्ये १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.
सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि या मिश्रणाने दिवसातून एकदा डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसांतच डार्क सर्कल्स कमी होतील.
डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी ही पथ्येही पाळा..
१. डार्क सर्कल्स अशक्तपणामुळेही येतात. त्यामुळे आपल्याला आहारातून सगळी जीवनसत्वे, पोषणमुल्ये मिळतात की नाही, हे देखील एकदा तपासून पाहा..
घरच्याघरी फक्त ५ रुपयांत तयार करा पाण्यावर तरंगणारे सुंदर दिवे, दिवाळीत उजळवून टाका घर...
२. रात्री जागरणाची सवय असेल तर ती सोडून द्या. लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.
३. रात्रीच्या वेळी अंधारात स्क्रिन पाहिल्यास डार्क सर्कल्स वाढतात. त्यामुळे स्क्रिन टाईम शक्य तेवढा कमी ठेवा.