रेश्मी जुल्फे, शरबती, मदहोश आंखे, कातील आंखे, सागर जैसी आंखे हिंदी सिनेमात डोळ्यांची किती सुंदर वर्णनं दिसतात. सुंदर टप्पोरे डोळे व्यक्तिमत्तवाचा आरसाच असतात. पण त्या सुंदर डोळ्यांखालची काळी वर्तुळं, त्यांचं काय करायचं? आणि आपण कितीही ठरवलं की ती डार्क सर्कल्स नकोत तरी ती येतातच. आपल्या तब्येतीच्या कुरकुरी, स्ट्रेस, जागरणं, हार्मोनल बदल, कामाचा शिण, अनुवंशिकता यासाऱ्याचा परिणाम म्हणून डोळ्याखाली काळी वर्तुळं येतातच. नुसत्या महागड्या क्रीम्स लावून काही हा प्रश्न सुटत नाही. व्यवस्थित आहार, झाेप, व्यायाम, स्ट्रेस घालवण्यासाठी मेडिटेशन हे सारं आवश्यक आहे. एका रात्रीत जशी ही वर्तुळं येत नाहीत तशी एका रात्रीत जातही नाहीत. त्यामुळे बाजारपेठीय जाहिरातीला भुलू नका. आपलं रुटीन ताळ्यावर आणा आणि सोबत करुन पहा हे काही घरगुती सोपे उपाय. एकदम स्वस्तात मस्त. पण नियमित करा. एकदा करुन काहीही बदल दिसणार नाही.
(Image : Google)
१. किसलेला बटाटा
किसलेल्या बटाटय़ाचा रस करा. या रसात कापसाचा बोळा बुडवा. डोळे बंद करा. कापसाचा हा बोळा साधारणपणो दहा मिनिटे काळ्या वर्तुळांवर ठेवा.
(Image : Google)
२. टोमॅटो आणि लिंबू
एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा लिंबू रस एकत्र करून हा रस डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर दहा मिनिटे लावून ठेवा. दहा मिनिटांनी साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाका. दिवसांतून दोन किंवा तीन वेळा हाच प्रयोग करा. टोमॅटो आणि लिंबाच्या रसात पुदीन्याची पानं टाकून तो रस तुम्ही प्यायलात तरी थोडय़ाच दिवसांत तुमच्या डोळ्यांखालची काळी वतरुळं कमी होऊ शकतात.
(Image : Google)
३. ग्रीन टी बॅग्ज
बाजारात मिळणाऱ्या ग्रीन टीच्या छोटय़ा बॅग फ्रिजमध्ये ठेवा. गार झालेल्या या बॅँग्ज डोळ्यांवर ठेवा.
(Image : Google)
४, बदामाचं तेल
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ असतं हे आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे. बदामाचं हे तेल काळ्या वर्तुळांवर लावा. हलकेच मसाज करा. रात्रभर ते तसंच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं धुवून टाका.
हे उपाय नियमित आलटून पालटून केले तर मदहोश, कातील आंखे अजून सुंदर दिसतील.