Lokmat Sakhi >Beauty > नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असतील तर डोळे थकल्यासारखे दिसतात. त्यामुळे चेहराही निस्तेज वाटू लागतो. म्हणून आता हा एक सोपा उपाय करून पाहा. (best remedies to remove pigmentation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 05:30 PM2024-09-20T17:30:04+5:302024-09-20T17:30:51+5:30

How To Get Rid Of Dark Circles: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं असतील तर डोळे थकल्यासारखे दिसतात. त्यामुळे चेहराही निस्तेज वाटू लागतो. म्हणून आता हा एक सोपा उपाय करून पाहा. (best remedies to remove pigmentation)

how to get rid of dark circles, simple remedies for dark circles, best remedies to remove pigmentation | नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

नवरात्रीपर्यंत डार्क सर्कल्स होतील गायब, ३ पदार्थांचा सोपा उपाय- थकलेले डोळे दिसतील चमकदार

Highlightsडोळ्यांभोवतीचा काळेपणा वाढला तर मग डोळेही खोल गेल्यासारखे आणि खूप थकलेले दिसतात.

काही जणींच्या डोळ्यांभोवती खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल्स असतात. यामुळे मग त्यांचे सौंदर्य कुठेतरी कमी झाल्यासारखे वाटते. डोळ्यांभोवतीचा काळेपणा वाढला तर मग डोळेही खोल गेल्यासारखे आणि खूप थकलेले दिसतात. याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर लगेचच दिसून येतो. त्यामुळे मग चेहराही निस्तेज वाटू लागतो (how to get rid of dark circles?). आता तर सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. त्यामुळे मग आपला चेहराही कसा प्रफुल्लित, आनंदी असणं गरजेचं आहे. म्हणूनच हा एक उपाय लगेचच सुरू करा (simple remedies for dark circles). नवरात्रीपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क सर्कल्स बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यासारखे जाणवतील. (best remedies to remove pigmentation)

 

डार्क सर्कल्स कमी करण्याचा उपाय

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हा उपाय केल्यावर अवघ्या ३ दिवसांतच तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल.

साध्याच साडीला द्या मॉडर्न लूक! स्टायलिश पद्धतीने साडी नेसण्यासाठी ५ टिप्स- दिसाल आकर्षक

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून बटाट्याचा रस घ्या. बटाट्याचा रस हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणूनच ओळखला जातो. चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होताे. 

 

आता बटाट्याच्या रसामध्ये १ चमचा काॅफी पावडर आणि १ चमचा मध टाका. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि मग चेहरा स्वच्छ धुवून हा लेप तुमच्या डोळ्यांभाेवती लावा.

काळे पडलेले सोन्याचे दागिने १० मिनिटांत करा चकाचक, पॉलिशिंगसाठी उगाच पैसे कशाला घालवायचे... 

त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. 

 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हे उपायही करा

१. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं खूप जास्त दिसत असतील तर तुमच्या आहारात अनेक पौष्टिक घटकांची कमतरता असू शकते. त्यामुळे तुमच्या आहाराकडे एकदा लक्ष द्या. हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी असणारी फळं भरपूर प्रमाणात खा.

रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ वाजता जेवल्याने तब्येतीवर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात ४ कारणं

२. ज्यांना रात्रीचे जागरण करण्याची सवय असते त्यांच्या डोळ्यांभोवतीही काळी वर्तुळं दिसतात. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

३. रात्री उशिरापर्यंत अंधारात स्क्रिन बघत बसणे टाळा.

४. ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असते, जे ॲनिमिक असतात त्यांच्या डोळ्यांभोवतीही डार्क सर्कल्स जास्त प्रमाणात दिसतात. 


 

 

Web Title: how to get rid of dark circles, simple remedies for dark circles, best remedies to remove pigmentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.