Lokmat Sakhi >Beauty > काळवंडलेल्या गुडघ्यांमुळे शॉर्ट ड्रेस घालणं नको वाटतं? १ सोपा उपाय- गुडघे लगेच स्वच्छ होतील

काळवंडलेल्या गुडघ्यांमुळे शॉर्ट ड्रेस घालणं नको वाटतं? १ सोपा उपाय- गुडघे लगेच स्वच्छ होतील

How To Clean Dark Knee And Elbow: गुडघे किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर हा उपाय करून पाहा. लहान मुलांचे गुडघे स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. (how to clean darkness on knees)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 01:20 PM2024-02-24T13:20:14+5:302024-02-24T13:22:42+5:30

How To Clean Dark Knee And Elbow: गुडघे किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर हा उपाय करून पाहा. लहान मुलांचे गुडघे स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. (how to clean darkness on knees)

How to get rid of dark knees and elbow? Home remedies for cleaning tanning on knees, Natural homemade scrub for tanned knees and elbow | काळवंडलेल्या गुडघ्यांमुळे शॉर्ट ड्रेस घालणं नको वाटतं? १ सोपा उपाय- गुडघे लगेच स्वच्छ होतील

काळवंडलेल्या गुडघ्यांमुळे शॉर्ट ड्रेस घालणं नको वाटतं? १ सोपा उपाय- गुडघे लगेच स्वच्छ होतील

Highlightsआठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. २- ३ आठवड्यांतच गुडघ्यांवरचं टॅनिंग पुर्णपणे निघून जाईल. 

एरवी आपण आपल्या त्वचेची भरपूर काळजी घेतो. पण नेमकं हाताचे कोपरे, पायाचे गुडघे आणि घोटे तसेच मान, पाठ या भागांची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यामुळे शरीराच्या इतर भागांपेक्षा हे भाग जरा जास्तच टॅन होऊन काळवंडले जातात (How to get rid of dark knees and elbow?). म्हणूनच आता या भागांपैकी गुडघ्यांचं टॅनिंग कमी करण्यासाठी घरच्याघरी कशा पद्धतीने स्क्रब तयार करायचं ते पाहूया. हा उपाय तुम्ही हाताचे काळवंडलेले कोपरे, पायाचे घोटे तसेच मान आणि पाठ स्वच्छ करण्यासाठीही करून पाहू शकता (Home remedies for cleaning tanning on knees). शिवाय लहान मुलांचे काळे पडलेले गुडघे स्वच्छ करण्यासाठी हा उपाय केला तरी चालेल. (Natural homemade scrub for tanned knees and elbow)

काळवंडलेले गुडघे स्वच्छ करण्याचा उपाय

 

काळवंडलेले गुडघे स्वच्छ करण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याची माहिती lets_benatural या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हा उपाय करण्यासाठी आपण सगळं घरगुती साहित्य वापरणार आहोत.

मधुमालतीची काळजी घेताना लक्षात ठेवा ३ गोष्टी- उन्हाळ्यात फुलांनी बहरून जाईल वेल

यासाठी एका वाटीत सगळ्यात आधी २ टेबलस्पून तांदळाची पावडर, २ टेबलस्पून पिठी साखर, २ टेबलस्पून कॉफी पावडर घ्या. यामध्ये आता १ टेबलस्पून खोबरेल तेल टाका आणि गरज पडेल तसं थोडं थोडं दही घालून ही पेस्ट कालवून घ्या. 

 

आता आपण तयार केलेलं हे स्क्रब गुडघ्यांवर लावा. स्क्रब गुडघ्यांवर लावण्यापुर्वी गुडघे थोडे ओलसर करून घ्या.

आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

स्क्रब लावून गुडघ्यांना ८ ते १० मिनिटे मालिश करा. यानंतर पुढचे ८ ते १० मिनिटे स्क्रब तसेच गुडघ्यांवर राहू द्या आणि त्यानंतर गुडघे धुवून टाका.

आठवड्यातून २ वेळा हा उपाय करा. २- ३ आठवड्यांतच गुडघ्यांवरचं टॅनिंग पुर्णपणे निघून जाईल. 

 

 

Web Title: How to get rid of dark knees and elbow? Home remedies for cleaning tanning on knees, Natural homemade scrub for tanned knees and elbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.