Lokmat Sakhi >Beauty > वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे नाक सोलवटले? डाग दिसतात, खडबडीत लागते? डर्मेटोलॉजिस्ट सांगतात खास उपाय...

वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे नाक सोलवटले? डाग दिसतात, खडबडीत लागते? डर्मेटोलॉजिस्ट सांगतात खास उपाय...

How to get rid of dark line on nose : Dermatologist tells causes of nose crease or dark line on nose & How to prevent it : सतत होणाऱ्या एलर्जीमुळे नाकावर आली आहे गडद रंगाची रेष, पहा नेमकं काय आहे कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 04:52 PM2024-08-07T16:52:26+5:302024-08-07T17:01:40+5:30

How to get rid of dark line on nose : Dermatologist tells causes of nose crease or dark line on nose & How to prevent it : सतत होणाऱ्या एलर्जीमुळे नाकावर आली आहे गडद रंगाची रेष, पहा नेमकं काय आहे कारण...

How to get rid of dark line on nose Dermatologist tells causes of nose crease or dark line on nose & How to prevent it | वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे नाक सोलवटले? डाग दिसतात, खडबडीत लागते? डर्मेटोलॉजिस्ट सांगतात खास उपाय...

वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे नाक सोलवटले? डाग दिसतात, खडबडीत लागते? डर्मेटोलॉजिस्ट सांगतात खास उपाय...

आपण बरेचदा पाहिले असेल की काहीजणांच्या नाकावर एक आडवी किंवा उभी खूण दिसून येते. ही खूण आपल्या सौंदर्यात बाधा आणते. आधी ही खूण खूप लहान आणि लाईट रंगाची असते. परंतु कालांतराने ही खून अधिक गडद होत जाते. हळुहळु ही नाकावरील रेष इतकी गडद होते की ती आपल्या स्किनचा एक भागच वाटते. नाकावर अशी गडद रंगाची रेष येण्यामागे अनेक कारण असू शकतात. नाकावर असे काळे डाग पडल्याने आपला चेहरा आणि त्वचा खराब दिसते(How to get rid of dark line on nose).

नाकावर ही गडद रंगाची रेष दिसण्यामागील कारणे... 

काहीजणांच्या नाकावर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची गडद आडवी रेष दिसून येते. नाकावरील या गडद रेषेला वैद्यकीय भाषेत 'ट्रान्सव्हर्स नेजल क्रिज' असे म्हणतात. काहीजणांना वर्षाचे बाराही महिने सर्दी, खोकला वारंवार शिंका येणे असा त्रास जाणवतो. सर्दी, खोकला, वारंवार शिंका येणे यांसारख्या एलर्जीमुळेच आपल्या नाकावर ही गडद रंगाची रेष येऊ शकते असे डर्मेटोलॉजिस्ट यांचे म्हणणे आहे. याशिवाय सर्दी झाल्यावर शक्यतो आपण काहीवेळा हाताने नाक पुसतो. नाक पुसताना तळहाताच्या साहाय्याने नाक वळवणे, ढकलणे किंवा वरच्या बाजूला घासणे यामुळे नाकावर ही लाईन येऊ शकते. अशाप्रकारे आपले नाक सतत वरच्या बाजूला हाताने ओढल्याने किंवा नाकावरील त्वचेवर ताण दिल्याने नाकावर अशी आडवी रेष येऊ शकते. त्याचबरोबर त्वचेतील मॅलेनिनच्या जास्त प्रमाणामुळे नाकावर (Dermatologist tells causes of nose crease or dark line on nose & How to prevent it) काळे डाग पडू शकतात. 


नाकावरील ही आडवी रेष घालवण्यासाठी या ३ गोष्टी लक्षात ठेवा... 

१. नाकावरील ही आडवी गडद रंगाची रेष नाहीशी करण्यासाठी सर्वात आधी एलर्जी आणि स्किन स्पेशालिस्ट डिक्टरांशी संपर्क करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार करण्याला प्राधान्य द्यावे. 

२. सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ करण्यासाठी तळहाताच्या साहाय्याने नाक वळवणे, ढकलणे किंवा वरच्या बाजूला घासणे असे प्रकार करु नयेत. नाकावर ही गडद रंगाची आडवी रेष येण्याचे हे मुख्य कारण असू शकते. त्यामुळे असे अजिबात करु नये. 

३. नाकावरील ही गडद रंगाची रेषा नाहीशी करण्यासाठी रात्रीच्या वेळी ग्लायकोलिक ॲसिड आणि दिवसा सनस्क्रीन सारख्या डिप पिग्मेंटेशन एजंट क्रिमचा वापर करणे आवश्यक आहे.

Web Title: How to get rid of dark line on nose Dermatologist tells causes of nose crease or dark line on nose & How to prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.