उन्हाळा असो किंवा पावसाळा काळवंडलेल्या मानेपासून कोणत्याच ऋतूमध्ये सुटका होत नाही. बऱ्याचदा आपण चेहऱ्याची योग्य काळजी घेतो. पण त्या तुलनेत शरीराच्या इतर अवयवांकडे मात्र दुर्लक्ष करतो. त्यातल्या त्यात तर मान, पाठ, हाताचे कोपरे आणि गुडघे या भागांकडे आपलं सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्या भागात डेड स्किन, टॅनिंग वाढत जाते आणि हे भाग इतर अवयवांपेक्षा जास्त काळे दिसू लागतात (Dark Neck).
मानेचा काळेपणा सहसा लवकर निघत नाही (Skin Care Tips). मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण टोमॅटोचा वापर करून काळेपणा घालवू शकता. पण मानेचा काळेपणा घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर कसा करावा? पाहा(How to get rid of dark neck by use of Tomato).
टोमॅटोचा वापर करा, घालवा मानेचा काळेपणा
लागणारं साहित्य
अर्धा टोमॅटो
कॉफी
कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..
हळद
अशा पद्धतीने काळवंडलेल्या मानेवर करा टोमॅटोचा वापर
सर्वप्रथम, काळवंडलेली मान स्वच्छ धुवून घ्या. अर्धा टोमॅटोचा घ्या, त्यावर अर्धा चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा भाजलेली हळद घेऊन मिक्स करा. अर्धा टोमॅटो मानेवर ठेवून हलक्या हाताने रगडून स्वच्छ करा. ४ ते ५ मिनिटांसाठी ही क्रिया सुरूच ठेवा. नंतर सामान्य पाण्याने मान स्वच्छ धुवून घ्या. एका वापरात आपल्याला फरक दिसणार नाही. पण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.
टोमॅटोच्या वापराने चेहरा उजळतो
उन्हात बाहेर पडताच स्किन टॅन होते? चेहराही काळवंडलाय? हळदीत मिसळा २ गोष्टी-सुंदर त्वचेचं सिक्रेट
फक्त पदार्थाचा आस्वाद वाढवण्यासाठी नसून, तजेल कांतीसाठीही आपण टोमॅटोचा वापर करू शकता. त्वचेवर टोमॅटो घासल्याने स्किन एक्सफॉलिएट होते. ज्यामुळे डेड स्किन रिमूव्ह होते आणि चेहऱ्याची डलनेस देखील दूर होते. शिवाय त्यात व्हिटॅमिन बी असते, जे एंटी-एजिंग प्रॉपर्टीजने परिपूर्ण असते. हे फाइन लाइन्स, डार्क सर्कल्सच्या समस्या दूर करते.