Join us  

सततच्या घामामुळे अंडरआर्म्स काळेकुट्ट झाले; २ रुपयांचा शाम्पू ‘या’ पद्धतीनं लावा, स्वच्छ दिसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 5:30 PM

How to Get Rid Of Dark Underarms : केस धुण्यासाठी आपण शॅम्पूचा वापर करतो. याच शॅम्पूचा वापर करून शरीरावरचा काळेपणाही दूर करता येऊ शकतो.

आपल्या शरीराचे काही भाग असे असतात जिथे काळपटपणा येतो आणि आपला आत्मविश्वासही कमी होतो. अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे  स्लिव्हजलेस कपडे घालता येत नाही. (Home Hacks) हात वर करायलाही अवघडल्यासारखे वाटते. अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता. केस धुण्यासाठी आपण शॅम्पूचा वापर करतो याच शॅम्पूचा वापर करून शरीरावरचा काळेपणाही दूर करता येऊ शकतो. अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर कसा करायचा ते समजून घेऊया. (How to Get Rid Of Dark Underarms)

डार्क अंडरआर्म्सचं कारण

आजकाल इंस्टंट हेअर रिमुव्ह करण्यासाठी रेजरचा वापर केला जातो. वारंवार एकाच ठिकाणी शेविंग किंवा वॅक्सिंग केल्यामुळे त्वचेवर हलका काळपटपणा येऊ शकतो.  याव्यतिरिक्त हॉर्मोन्स बदलतात. डेड स्किन सेल्स जमा होतात, एक्जिमा किंवा त्वचेचा कोणताही आजार होणं यामुळे अंडरआर्म्स काळे पडतात. अंडरआर्म्स काळे पडू नयेत यासाठी कोणते उपाय करावेत समजून घेऊ.

अंडरआर्म्स चमकवण्यासाठी घरगुती उपाय 

१) टोमॅटो पल्प - १ चमचा

२) कॉफी - १ चमचा

३) बेसन - १ चमचा

४) शॅम्पू - १ चमचा

५) बेकिंग सोडा - १ चमचा

६) लिंबांचा रस -१ चमचा

सगळ्यात आधी एक टोमॅटो घ्या आणि बारीक करून  १ चमचा पल्प तयार करून घ्या. नंतर एका वाटीत १ चमचा कॉफी, बेसन, शॅम्पू आणि लिंबू घालून मिक्स करा. हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून  घ्या नंतर डार्क अंडरआर्म्सवर लावा.  ५ मिनिटं सुकू द्या. त्या नंतर अंडरआर्म्स स्वच्छ पाण्यानं धुवून  घ्या. हा उपाय केल्यानंतर आधीपेक्षा जास्त चमकदार अंडरआर्म्स दिसतील. हा उपाय करून तुम्ही काळे पडलेले कोपर, बोटं, गुडघे किंवा मान उजळवू शकता. 

 दिवाळी विशेष : ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० युनिक डिजाईन्स-नव्या पॅटर्नने वाढेल साडीची शोभा

टोमॅटोमध्ये प्राकृतिक एसिड आणि व्हिटामीन सी  असते. जे उत्तम स्किन केअर इंग्रेडिएंटचं काम करते. टॅनिंग त्वचेशी संबंधित एक समस्या आहे. पण ही समस्या वाढल्यास तुमचा लूक खराब होऊ शकतो. टोमॅटोमध्ये नॅच्युरल ब्लिचिंग गुण असतात ज्यामुळे त्वचेचा डार्कनेस कमी होतो आणि स्किन ब्राईट होते. तुम्ही टोमॅटोमध्ये कॉफी मिसळूनही अंडरआर्म्सवर लावू शकता ज्यामुळे काळेपणा दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी