Join us  

पावडर लावली की चेहरा खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो? आंघोळीनंतर चेहऱ्याला ‘हे’ लावा, ड्रायनेस गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 9:06 PM

How to get Rid of Dry Skin in Winters (Dry skin sathi Upay sanga) : नारळाच्या तेलात फॅटी एसिड्स  मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते.

हिवाळ्याच्या दिवसांत त्वचेवर ड्रायनेस फार दिसून येतो. (Dryness on Skin) थंड हवेमुळे चेहरा कोरडा पडतो गरम पाण्याच्या वापराने चेहरा आणखीच ताणल्यासारखा दिसू लागतो. चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात आणि मेकअपही व्यवस्थित  सेट होत नाही. (Skin dry hou naye yasathi upay) जर तुमची स्किनसुद्धा गरजेपेक्षा जास्त ड्राय असेल आणि जास्त पांढरी दिसत असेल तर अंघोळीनंतर काही उपाय केल्यास त्वचेवर मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होईल.

सतत क्रिम्स वापराव्या लागणार नाहीत.  (Apply These Oil an Face After Shower to get Rid of Dry Skin)  गारठ्याच्या दिवसांत त्वचेची एक्स्ट्रा केअर करण्याची गरज असते. अन्यथा त्वचा डल दिसते. अंघोळीनंतर त्वचेला तुम्ही कोल्ड क्रिम लावत असाल किंवा नसाल तर या घरगुती गोष्टी लावल्यानंतरही तुमचा चेहरा ग्लो करेल.

१) एलोवेरा जेल

अंघोळीनंतर एलोवेरा जेल तुम्ही तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. एलोवेरा जेलमधील एंटी इंफ्लेमेटरी गुण आणि यातील कुलिंग गुण त्वचेला आराम देतात. एलोवेरा जेल चेहऱ्याला लावल्याने फक्त त्वचेचा कोरडेपणा दूर होत नाही तर चेहरा मऊ राहण्यासही मदत होते. 

२) ऑलिव्ह ऑईल

चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शतका. ऑलिव्ह ऑईल  त्वचेला मॉईश्चराईज ठेवते आणि त्वचेवरील इरिटेशन कमी  करण्यास मदत करते.

अभिनेत्रींच्या दाट केसांचं सोपं सिक्रेट -रोज करतात ३ गोष्टी, तुम्हीही फॉलो करा-मिळवा लांब केस

३) दूध

कच्च दूध चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. कच्च दूध चेहऱ्याला १० ते १५ लावून ठेवा नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यास कोणतीही क्रिम चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर चमक दिसून येईल याशिवाय त्वचा कोरडी दिसून येणार नाही. 

४) नारळाचे तेल

नारळाच्या तेलात फॅटी एसिड्स  मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते. त्वचेवर  चमक येते आणि त्वचा जराही फाटत नाही.  खूप जास्त ड्राय स्किन असेल तर नारळाच्या तेलापेक्षा उत्तम कोणताही उपाय नाही.

डोक्यावर पांढरे केस जास्तच उगवताहेत? नारळाच्या शेंड्यांचा करा नैसर्गिक हेअर डाय-काळे होतील केस 

५) बदामाचे तेल

व्हिटामीन ई ने परिपूर्ण बदामाचे तेल लावल्याने चेहऱ्याला आतून पोषण मिळते. बदामाच्या तेलाचे काही थेंब चेहऱ्याला लावल्याने  कोरडी त्वचा, फाटलेले ओठ अशा समस्या टाळता येतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी