चेहऱ्याची सुंदता टिकवून ठेवणं खूपच कठीण असतं. वढत्या वयात चेहऱ्यावरच नैसर्गिक मॉईश्चर कमी झाल्यानं बारीक रेषा म्हणजेच सुरकुत्या दिसू लागतात. तुम्हालाही त्वचेच्या या समस्या जाणवत असतील तर वेळीच लक्ष द्यायला हवं. नाहीतर वाढत्या वयात चेहरा डल, वयस्कर दिसू शकतो. (How to get rid of fine lines and wrinkles) या बारीक लाईन्स काही वेळानंतर सुरकुत्याचं रूप घेतात. चेहऱ्यावरच्या पातळ रेषांना फाईन लाईन्स (Fine lines on face) असं म्हटलं जातं. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स दिसत असतील काहीवेळानंतर चेहऱ्याचा ग्लो कमी होऊ शकतो. डोळे, तोंड आणि कपाळाजवळ सुरकुत्या दिसून येतात. (How to get rid of fine lines)
फेस मास्क
फाईन लाईन्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंदाचा वापर करू शकता. स्किन केअर रूटीनमध्ये फेस पॅकचा समावेश करा. यात व्हिटामीन ई आणि सी आढळते. यामुळे फाईन लाईन्स रोखल्या जातात. सर्व प्रथम सफरचंद स्वच्छ धुवून सोलून घ्या. (How to Remove Wrinkles at Home Naturally) आता त्याचा पल्प काढा. सफरचंदाच्या पल्पमध्ये 1 चमचे मध घाला. आता दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. बारीक रेषांसाठी हा फेस पॅक आहे. स्वच्छ हातांनी चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा. डोळ्यांजवळ लावताना योग्य खबरदारी घ्या. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.
१) सुर्याच्या हानीकारक किरणांमुळे चेहरा डॅमेज होऊ लागतो. फ्री रेडिकल्समुळे त्वचा वेळेआधीच वयस्कर दिसते. यामुळे सन डॅमेज होऊ शकतं. यापासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्यानं फाईन लाईन्सची समस्या टळते.
महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम
२) रोज न चुकता चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावरचा मेकअप काढा. मेकअप आपल्या स्क्रीनला धोका पोहोचवू शकतो. यामुळे दीर्घकाळ त्वचेवर फाईन लाईन्स येऊ शकतात. मेकअप काढून टाकण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता.
३) जर तुमच्या चेहऱ्यावर बारीक रेषा असतील तर यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करा. कोरड्या त्वचेवर बारीक रेषा सहज दिसतात. चांगले ब्रॅण्डेड मॉइश्चरायझर खरेदी करा. दररोज सकाळी आणि रात्री वापरा.
४) त्वचेवर तुम्ही फेशियल किंवा फेस क्लिनअपसुद्धा करू शकता. फेस ट्रिटमेंट त्वचेला डिप क्लिन करण्यासह हेल्दी ठेवण्यास मदत करते. तुम्ही चॉकलेट, एलोवेरा जेल यांसारख्या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीनं चेहरा स्वच्छ करू शकता.