Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारुण्यात पांढऱ्या केसांमुळे वयस्कर दिसता? केस काळे करायचा १ सोपा उपाय

ऐन तारुण्यात पांढऱ्या केसांमुळे वयस्कर दिसता? केस काळे करायचा १ सोपा उपाय

How to Get Rid of Gray Hair Easy Home Remedy : एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 03:45 PM2022-08-19T15:45:16+5:302022-08-19T15:51:22+5:30

How to Get Rid of Gray Hair Easy Home Remedy : एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतात का?

How to Get Rid of Gray Hair Easy Home Remedy : Does gray hair make you look older? 1 simple solution to make hair black | ऐन तारुण्यात पांढऱ्या केसांमुळे वयस्कर दिसता? केस काळे करायचा १ सोपा उपाय

ऐन तारुण्यात पांढऱ्या केसांमुळे वयस्कर दिसता? केस काळे करायचा १ सोपा उपाय

Highlightsपांढरे केस काळे होण्यासाठीही कडीपत्ता अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय नारळाचे तेलही केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. आपले केस पांढरे कशामुळे झाले याचे कारण शोधणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

कधी अनुवंशिकतेमुळे, कधी शरीरात काही घटकांची कमतरता असल्याने तर प्रदूषण, केमिकल उत्पादने, तर कधी आणखी काही कारणांनी कमी वयात केस पांढेर होतात. एकदा केस पांढरे झाले की आपण विनाकारण वयस्कर दिसायला लागतो. पांढऱ्या झालेल्या केसांना कधी आपण डाय लावतो तर कधी मेहंदी लावतो. मात्र त्यासाठी सतत पार्लरमध्ये जाणे, पैसे खर्च होणे अशा सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. त्यापेक्षा केस पांढरेच होऊ नयेत म्हणून आपला आहार-विहार योग्य असायला हवा (Easy Home Remedy). इतकेच नाही तर पांढरे झालेले केस कोणत्या घरगुती उपायांनी काळे करता येतात याबाबत आपल्याला माहिती असायला हवी (How to Get Rid of Gray Hair). 

(Image : Google)
(Image : Google)

एकदा पांढरे झालेले केस परत काळे होतात का? 

एकदा केस पांढरे झाले की ते पुन्हा काळे कसे होणार असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडत असेल. पण आपले केस पांढरे होण्याचे कारण अनुवंशिकता असेल तर ते पुन्हा कोणत्याही प्रयत्नांनी काळे होत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केसांच्या आतील छिद्रांमध्ये असलेल्या पिगमेंट सेल्स नष्ट झालेल्या असतात त्यांना पुन्हा निर्माण करणे शक्य नसते. पण इतर कोणत्या कारणांनी आपले केस पांढरे झाले असतील तर ते पुन्हा काळे होणे शक्य असते. त्यामुळे आपले केस पांढरे कशामुळे झाले याचे कारण शोधणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

काय आहे उपाय ? 

औषधी गुणांनी उपयुक्त असलेला कडीपत्ता केसांसाठी अतिशय आवश्यक असतो. केसांची वाढ होण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी, केसांची चमक वाढवण्यासाठी आणि कोंड्यावर उपचार म्हणून कडीपत्त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पांढरे केस काळे होण्यासाठीही कडीपत्ता अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय नारळाचे तेलही केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे या दोन्ही घटकांचा पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

काय कराल?

एक कप कडीपत्ता आणि १ कप नारळाचे तेल एकत्र घेऊन ते उकळा. हे तेल काळे होईपर्यंत उकळा आणि गार झाल्यावर आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना रात्री झोपताना लावा. यामुळे केस काळे होण्यास निश्चितच मदत होईल. 


 

Web Title: How to Get Rid of Gray Hair Easy Home Remedy : Does gray hair make you look older? 1 simple solution to make hair black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.