गौरी गणपती काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या दिवसांत आपण एकमेकांकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातो. यावेळी सणावाराला आपण मस्त आवरतो. छान कपडे, दागिने, मेकअप आणि हेअरस्टाईल करतो. पण या सगळ्यात जर आपल्या डोक्यातील पांढरे केस चमकले तर वय वाढलेलं नसतानाही ते दिसून येतं. मग आपल्याला पार लाजल्यासारखे होते. एकदा केस पांढरे झाले की त्यांना हेअर कलर करणे हा एकच उपाय आपल्याकडे राहतो. कलर केल्याने पांढऱ्या केसांची संख्या वाढत जाते (How to Get Rid of Gray Hair Easy Home Remedy).
बाजारात मिळणारे डाय किंवा हेअर कलर आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. त्यामुळे केसांचा पोत तर खराब होतोच पण त्वचेच्या तक्रारी, अंगावर रॅश येणे किंवा इतरही काही त्रास होण्याची शक्यता असते. कमी वयात केस पांढरे होण्यामागे ताणतणाव, अनुवंशिकता, शरीरात काही घटकांची कमतरता असणे, केमिकल्सचा अतिवापर अशी बरीच कारणे असू शकतात. अशावेळी घरच्या घरी केस काळे करण्याची सोपी ट्रिक आपल्याला माहित असेल तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो.
१. एका पॅनमध्ये अर्धी वाटी मेथ्यांचे दाणे घेऊन ते चांगले परतून घ्यायचे.
२. यामध्ये कडीपत्त्याची १० ते १५ पाने घालून तिही परतून घ्यावीत.
३. हे दोन्ही थोडे थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन एखाद्या काचेच्या बरणीत ठेवावी.
४. यामध्ये आपल्या आवडीचे खोबऱ्याचे, तिळाचे, ऑलिव्ह ऑईल असे कोणतेही पूर्ण १ ते १.५ वाटी तेल घालायचे.
५. ही बरणी किमान किमान ३ दिवस उन्हात ठेवायची म्हणजे हे सगळे चांगले एकजीव होण्यास मदत होते.
६. हे तेल बोटांनी केसांच्या मूळाशी लावायचे आणि रात्रभर तसेच ठेवून आपण शाम्पू कंडीशनर करतो त्याप्रमाणे केस दुसऱ्या दिवशी धुवायचे.
७. आठवड्यातून किमान २ वेळा हा प्रयोग केल्यास केस पांढरे होण्यापासून आपली सुटका होऊ शकते.