Lokmat Sakhi >Beauty > केसांत उवा झाल्या? जावेद हबीब सांगतात ‘या’ फळाच्या बिया केसांना लावा, उवा होणार नाहीत

केसांत उवा झाल्या? जावेद हबीब सांगतात ‘या’ फळाच्या बिया केसांना लावा, उवा होणार नाहीत

How to Get Rid Of Lice : उवा डोक्याला चिकटून राहतात आणि अंडी देतात. उवांची संख्या डोक्यात वाढू लागते. अशा स्थितीत काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही उवांना लांब ठेवू  शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 11:48 AM2024-02-05T11:48:46+5:302024-02-05T16:21:27+5:30

How to Get Rid Of Lice : उवा डोक्याला चिकटून राहतात आणि अंडी देतात. उवांची संख्या डोक्यात वाढू लागते. अशा स्थितीत काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही उवांना लांब ठेवू  शकता.

How to Get Rid Of Lice : Hair Expert Jawed Habib Shares a Best Natural Treatment To Get Rid Of Lice From Hair | केसांत उवा झाल्या? जावेद हबीब सांगतात ‘या’ फळाच्या बिया केसांना लावा, उवा होणार नाहीत

केसांत उवा झाल्या? जावेद हबीब सांगतात ‘या’ फळाच्या बिया केसांना लावा, उवा होणार नाहीत

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच केसाांची काळजी घेणंही महत्वाचे असते. (Hair Care Tips) केसांची योग्य काळजी घेतली नाही तर खाज येते, कोंडा होतो आणि उवा पडतात. शाळेत, कॉलेजात किंवा प्रवासादरम्यान वावरत असताना मुलींच्या डोक्यात उवा होतात. एकदा डोक्यात उवा झाल्या तर  त्या काढणं म्हणजे खूपच कठीण काम. (Hair Expert Jawed Habib Shares a Best Natural Treatment To Get Rid Of Lice From Hair) उवा चावत असल्यामुळे फारच अस्वस्थ वाटतं आणि 

उवा डोक्याला चिकटून राहतात आणि अंडी देतात. उवांची संख्या डोक्यात वाढू लागते. अशा स्थितीत काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही उवांना लांब ठेवू  शकता. हेअर केअर एक्सपर्ट जावेद  हबीब यांनी काही घरगुती उपाय शेअर केले आहेत. ज्याच्या वापराने तुम्ही लांबच लांब केस मिळवू शकता आणि उवांची समस्या टाळता येईल. (How to Get Rid Of Lice)

रिपो्र्टनुसार जवळपास उवा ही १ लाख वर्ष जुनी प्रजाती आहे. उवांचे क्लेड्स ओळखण्यासाठी त्यांना  ए, बी, सी मध्ये विभागण्यात आलं आहे. जर्नल ऑफ परासिटोलॉजीनुसार उवा उत्तर अमेरिकेत पैदा झाल्या होत्या. त्यांतर युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशात पसरत गेल्या.

सिताफळाच्या बियांचा वापर करा

जावेद हबीब यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत  या बियांबद्दल  सांगितले आहे. त्यांनी सांगितले की सिताफळाच्या बिया  वाटून त्याची पावडर बनवा. त्यात नारळाचे तेल मिसळा. हे तेल केसांना  लावून केस धुण्याच्या अर्धा तास आधी स्काल्पची  मसाज करा. ज्यामुळे डोक्यात उवा पडणार नाहीत. सिताफळाच्या बियांव्यतिरिक्त तुम्ही कांद्याचा  रसही वापरू शकता.

यासाठी कांद्याचा रस ३ ते ४ तास  केसांना लावून ठेवा. त्यानंतर कंगव्याच्या साहाय्याने उवा काढून घ्या.  त्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता. कडुलिंबाची पानं पाण्यात  व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर पाणी एका भांड्यात ठेवा ठंड झाल्यानंतर हे पाणी केसांना लावा. यामुळे केसांवर चांगला फरक दिसून येईल. 

Web Title: How to Get Rid Of Lice : Hair Expert Jawed Habib Shares a Best Natural Treatment To Get Rid Of Lice From Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.