Lokmat Sakhi >Beauty > उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

How to get rid of redness on your face: 5 must-read tips त्वचेवर रेडनेस - रॅशेसमुळे अनेक समस्या निर्माण होतात, त्वचेची काळजी घेण्यासाठी ८ उपाय, स्किन करेल ग्लो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 01:19 PM2023-04-11T13:19:50+5:302023-04-11T13:20:40+5:30

How to get rid of redness on your face: 5 must-read tips त्वचेवर रेडनेस - रॅशेसमुळे अनेक समस्या निर्माण होतात, त्वचेची काळजी घेण्यासाठी ८ उपाय, स्किन करेल ग्लो..

How to get rid of redness on your face: 5 must-read tips | उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

उन्हाळ्यात अनेक समस्या उद्भवतात, ज्यात त्वचेसह शरीराला देखील हानी पोहचते. उन्हात बाहेर गेल्यानंतर त्वचा टॅन पडते. त्वचा निस्तेज व कोरडी दिसू लागते. उन्हात गेल्यानंतर काहींची त्वचा लालसर पडते. ही समस्या खरंतर, सेन्सिटिव्ह स्किनवर उद्भवते, ज्यामुळे त्वचेवर सनबर्न अथवा एलर्जिक रिएक्शन दिसून येतात.

त्वचा लाल पडल्यानंतर चेहऱ्यावर खाज, मुरूम, जळजळ इत्यादींची समस्या उद्भवते. आपल्या त्वचेवर देखील उन्हात गेल्यानंतर लाल रॅशेस पडत असतील तर, हे उपाय करून पाहा. या घरगुती उपायांमुळे उन्हात गेल्यानंतर त्वचेवर लाल  रॅशेस पडणं कमी होईल. व चेहऱ्यावर नवी ग्लो येईल(How to get rid of redness on your face: 5 must-read tips).

त्वचेवर लाल रॅशेस आल्यावर करून पाहा हे उपाय 

गुलाब जल

उन्हाळ्यात त्वचेवर लाल रॅशेस पडतात. जर या समस्येपासून आराम हवं असेल तर, गुलाब जलचा वापर करून पाहा. गुलाब जल त्वचेला थंडावा देतो. यासह त्वचेची जळजळ कमी होते. गुलाब पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे कट, चट्टे आणि सनबर्न्स बरे होतात. यासाठी एका वाटीत काकडीची पेस्ट घ्या, त्यात गुलाब जल मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट त्वचेवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल.

उन्हाने त्वचा निस्तेज झाली, तुरटीचा सोपा असरदार उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई तसेच बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे रेडनेस व रॅशेसपासून आराम मिळतो. यासाठी एलोवेरा जेल ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या उपायामुळे चेहऱ्याला थंडावा मिळेल.

हेअर स्ट्रेटनिंगसाठी करायचं आहे, १० रुपये दह्यावर खर्च करा, सरळ-सिल्की केसांसाठी हा घ्या दह्याचा उपाय

बर्फ

बर्फाच्या वापरामुळे त्वचेवरील पोर्स घट्ट होतात. व चेहऱ्याला थंडावा मिळतो. यासाठी एका सुती कपड्यात बर्फाचे तुकडे घ्या, व याने चेहऱ्याला शेक द्या. उन्हातून आल्यानंतर चेहऱ्याला शेक दिल्यामुळे त्वचेवर रेडनेस व रॅशेस उठणार नाही.

सनस्क्रीन लावा

उन्हाळ्यात बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर पडा. सनस्क्रीन आपली त्वचा कव्हर करते. सूर्यकिरणांमुळे त्वचा खूप निस्तेज व कोरडी पडते. यासह रॅशेस व रेडनेसची समस्या उद्भवते. त्यामुळे सनस्क्रीन लावून चेहऱ्याला कव्हर करा.

फक्त कपाळ खूप काळे पडले आहे? ५ घरगुती उपाय - काळेपणा होईल कमी

तेलकट व स्पाईसी खाणं बंद करा

उन्हाळ्यात शक्यतो थंड पदार्थाचे सेवन करा. कारण मसालेदार व तेलकट पदार्थामुळे शरीराला व त्वचेला हानी  पोहचते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमित ८ ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे त्वचा साफ राहते.

Web Title: How to get rid of redness on your face: 5 must-read tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.