Join us  

कपाळावर फार पिंपल्स, चेहरा विचित्र दिसतो? १ उपाय, पिंपल्स होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 6:25 PM

How to get rid of small bumps on the forehead फोरहेड पिंपल्समुळे त्रस्त आहात? ऍपल सायडर व्हिनेगरचा करा असा वापर..

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या अनेक कारणांमुळे निर्माण होते. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या आणखी वाढते. गाल, नाक, याशिवाय कपाळावर देखील पिंपल्स येतात. पिंपल्स येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पण काही केल्या ही समस्या लवकर सुटत देखील नाही. कपाळावरील पिंपल्समुळे चेहऱ्याची शोभा कमी होते. त्यामुळे पूर्ण लूक बदलतो.

गालावरील पिंपल्सच्या तुलनेत कपाळावरील पिंपल्स लवकर जात नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर करा. याच्या वापरामुळे नक्कीच उत्तम फरक दिसेल(How to get rid of small bumps on the forehead).

कपाळावर पिंपल्स का येतात?

- जर आपले कपाळ नेहमी ऑइली राहत असेल, तर कपाळावर पिंपल्स येण्याची शक्यता देखील तितकीच वाढते. तेलकट त्वचेवर धूळ - माती सहज जमा होते. ज्यामुळे पिंपल्स येतात. आपण जर रोज चेहरा साफ करत नसाल तर, ही समस्या आणखी वाढत जाईल.

काकडी-कोरफड आणि मुलतानी माती; उन्हाळ्यातला कोरडा निस्तेज चेहरा होईल फुलासारखा टवटवीत

- चुकीचा मेकअप व पोर्स ब्लॉकिंग प्रोडक्ट्समुळे कपाळावर मुरूम तयार होतात. त्यामुळे स्किन केअर प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर हे प्रॉडक्ट्स सूट होणार की नाही, हे तपासून घ्या. चेहऱ्यावर स्वस्त व लोकल प्रॉडक्ट्स वापरणे टाळा.

ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर

यासाठी एका वाटीत २ चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घ्या, त्यात एक चमचा पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण कॉटन बॉलच्या मदतीने कपाळावरील पिंपल्सवर लावा. व काही मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. याच्या वापरामुळे स्किन साफ होईल, व पिंपल्सची समस्याही कमी होईल.

कांद्याची टरफलं कचरा म्हणून फेकू नका, ५ मिनिटांत करा झटपट हेअर डाय! केस काळेभोर होतील

ऍपल सायडर व्हिनेगरचे फायदे

ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे मुरुम व त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यास मदत करतात.त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यासाठी आपण ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. ऍपल सायडर व्हिनेगर त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी