Lokmat Sakhi >Beauty > हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला

हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला

Skin Care Tips For Strawberry Skin or Chicken Skin: चिकन स्किन किंवा स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास अनेक जणांना दिसून येतो. याबाबत त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला तर घ्याच, पण त्यासोबतच हा एक घरगुती उपायही करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 01:34 PM2023-09-26T13:34:04+5:302023-09-26T13:34:50+5:30

Skin Care Tips For Strawberry Skin or Chicken Skin: चिकन स्किन किंवा स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास अनेक जणांना दिसून येतो. याबाबत त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला तर घ्याच, पण त्यासोबतच हा एक घरगुती उपायही करून पाहा.

How to get rid of strawberry skin or chicken skin? Home remedies for Keratosis pilaris | हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला

हातापायांवर लाल- काळे दाणे दिसतात, चिकन स्किनचा त्रास? १ सोपा उपाय, स्किन स्पेशालिस्टचाही घ्या सल्ला

Highlightsहा उपाय करण्याआधी त्याची पॅच टेस्ट जरूर घ्या. तुमच्या त्वचेला सहन झालं तरच हा उपाय करा.

काही जणांच्या हातापायांवर लाल- काळे पुरळ दिसून येतात. त्याला Keratosis pilaris असं म्हणतात. चिकन स्किन किंवा स्ट्रॉबेरी स्किन म्हणूनही अशी त्वचा ओळखली जाते. आपल्या त्वचेच्या खाली keratin plugs प्रोटिन्स तयार करणारे जे फॉलिकल्स असतात ते त्वचेवर लाल, काळपट किंवा त्वचेच्याच रंगाचे छोटे छोटे दाणे तयार करतात. त्यामुळे तिथली त्वचा पुरळ आल्यासारखी खडबडीत दिसते. हाताच्या कोपऱ्यांच्या आसपास, गुडघ्यांजवळ, मांडीवर त्याचे प्रमाण जास्त असते. अभिनेत्री यामी गौतमी हिला देखील असा त्रास आहे, असे तिने मागे काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.  त्वचेवरचे हे लालसर- काळपट दाणे काढून टाकायचे असतील, तर काय उपाय (Home remedies) करावा ते आता पाहूया... (How to get rid of strawberry skin or chicken skin?)

 

चिकन स्किन किंवा स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

हा उपाय इन्स्टाग्रामच्या mysha_beauty_queen या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

हा उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य

१ टीस्पून तांदळाचं पीठ

परिणीती चोप्रानं लग्नात घातलेलं हिऱ्यांचं देखणं 'आयरा' नेकलेस केवढ्याचं असेल? महागड्या दागिन्याची न्यारी गोष्ट...

एक तृतीयांश टी स्पून बेकिंग पावडर

२ टी स्पून दही

अर्धा टिस्पून लिंबाचा रस

 

कसा करायचा उपाय?

आता वरील साहित्य वापरून आपल्याला स्ट्रॉबेरी किंवा चिकन स्किनचा त्रास कमी करण्यासाठी लेप तयार करायचा आहे.

हा लेप करण्यासाठी वरील सर्व साहित्य एका वाटीमध्ये घ्या आणि व्यवस्थित कालवून एकत्र करा. 

गव्हाची पोळी खावी की तीन-चार धान्य एकत्र करुन मल्टीग्रेन पोळी खाणं फायद्याचं? काय टाळलेलंच बरं..

आता लेप तुमच्या त्वचवर लावा. ३ ते ४ मिनिटे स्क्रब करा. 

त्यानंतर ८ ते १० मिनिटे त्वचेवर तसाच राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. 

चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा, असं सुचविण्यात आलं आहे.

 

हे देखील लक्षात घ्या

हा उपाय करण्याआधी त्याची पॅच टेस्ट जरूर घ्या. तुमच्या त्वचेला सहन झालं तरच हा उपाय करा.

लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत

स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास कमी करण्यासाठी कडक पाण्याने आंघोळ करू नये. तसेच त्वचा नेहमी मॉईश्चराईज ठेवावी असंही स्किन स्पेशालिस्ट सांगतात. 

 

Web Title: How to get rid of strawberry skin or chicken skin? Home remedies for Keratosis pilaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.