Lokmat Sakhi >Beauty > कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक खराब करतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स

कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक खराब करतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स

How To Get Rid of Stretch Marks : नारळ तेल आणि एलोवेरा जेल दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत आणि दोन्ही त्वचेला आश्चर्यकारकपणे हायड्रेट करण्यात मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:07 PM2022-07-04T14:07:48+5:302022-07-05T12:03:42+5:30

How To Get Rid of Stretch Marks : नारळ तेल आणि एलोवेरा जेल दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत आणि दोन्ही त्वचेला आश्चर्यकारकपणे हायड्रेट करण्यात मदत करतात.

How To Get Rid of Stretch Marks : How to remove stretch marks permanently | कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक खराब करतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स

कंबर, पोटावरचे स्ट्रेच मार्क्स लूक खराब करतात? ५ उपाय, कायमचे जातील स्ट्रेच मार्क्स

वजन वाढणं, कमी होणं असे बदल प्रत्येकामध्ये होत असतात. या बदलांदरम्यान काही शारिरीक समस्या उद्भवतात त्यापैकीच एक म्हणजे स्ट्रेच मार्क्स. काहीजणींना छातीवर, काहींना कंबरेवर, पोटावर तर काहींच्या मांड्यावर या खुणा दिसून येतात. (How to remove stretch marks fast) स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी महागडी उत्पादनं वापरूनही अनेकदा उपयोग होत नाही. साडी किंवा वनपीस घालायचं म्हटलं की या खुणा कशा लपवायच्या ते सुचत नाही. या लेखात तुम्हाला स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.  या सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (How to remove stretch marks permanently)

१) नारळाचं तेल आणि एलोवेरा (Stretch Marks removal Tips)

नारळ तेल आणि एलोवेरा जेल दोन्ही नैसर्गिक मॉइश्चरायझर्स आहेत आणि दोन्ही त्वचेला आश्चर्यकारकपणे हायड्रेट करण्यात मदत करतात. नारळाच्या तेलात त्वचा बरी करण्याचे गुणधर्म आहेत. एलोवेरा त्वचेची दुरुस्ती आणि पुन्हा बरी करण्यासाठी उपयुक्त आहे.  अधिक चांगल्या परिणामांसाठी, तुमच्या शरीरावर जेथे स्ट्रेच मार्क्स असतील तेथे दररोज थोड्या प्रमाणात तेल लावा. दोन ते तीन दिवसात तुम्हाला दिसेल की स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागले आहेत. खोबरेल तेल स्ट्रेच मार्क्सच्या वाढीस प्रतिबंध करते आणि म्हणून गर्भवती महिलांना मार्क्स दूर ठेवण्यासाठी नारळाच्या तेलाने ओटीपोटाची मालिश करण्याचा सल्ला दिला जातो.

२) बदामाचं तेल

बदामाचे तेल त्वचेसाठी उत्तम आहे. कोरडी त्वचा, काळी वर्तुळे आणि स्ट्रेच मार्क्स यासारख्या तुमच्या त्वचेच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गरोदरपणानंतर या तेलाचा भरपूर वापर केला आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो की ते अत्यंत सुरक्षित आहे. व्हिटॅमिन ई आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध, बदामाचे तेल प्रभावित भागात खोल मॉइश्चराइझ करते, पेशींचे आरोग्य सुधारते.

लालसरपणा कमी होतो आणि स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतात. यासाठी तुम्ही बदामाचे थोडे तेल गरम करून तुमच्या त्वचेवर मार्क्स असलेल्या भागावर मसाज करा, नंतर ते त्वचेत शोषले जाण्यासाठी सोडा. दिवसातून दोनदा हे करा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. 


३) बेकिंग सोडा, लिंबू

बेकिंग सोडा एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे, तर लिंबामध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेचा रंग किंचित सुधारतो. बेकिंग सोडा त्वचेच्या मृत पेशी तसेच स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यास मदत करतो. लिंबू लालसरपणा कमी करते आणि खुणांना अदृश्य करतो. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी आणि उत्तम मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक चमचा बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा ताजा रस लागेल. यासाठी तुम्ही किचन रोल देखील वापरू शकता. 

दोन्ही घटक मिसळा आणि स्ट्रेच मार्क्सवर लावा. क्लिंग रॅपने झाकून ठेवा आणि २० मिनिटांनी धुवा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर तुम्ही प्रथम तुमच्या त्वचेवर थोडेच लावणे चांगले.  10 मिनिटे सोडा आणि नंतर धुवून टाका.

४) बटाट्याचा रस

बटाट्याचा रस काळ्या वर्तुळांवर उपचार करण्यासाठी चांगला मानला जातो. हे तुम्हाला स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते. बटाट्यामध्ये स्टार्च असते आणि इतर अनेक त्वचा उजळणारे एंजाइम असतात, जे त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतात. तसेच, बटाट्यामध्ये असलेले कॅटेकोलेज हे ब्लीचिंग एजंट आहे, जे डाग हलके करण्यास आणि चमकदार त्वचा देण्यास मदत करतात.

स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी बटाटा कसा वापरायचा, तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बटाटा किसून त्याचा रस पिळून घ्या. किसलेल्या लगद्यामध्ये रस मिसळा आणि हा पॅक स्ट्रेच मार्क्सवर लावा. 30 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. बटाट्याचा रस नियमित वापरल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतील आणि तुम्हाला निरोगी त्वचा मिळेल.

५) टि ट्रि ऑईल

मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी आणि मुरुमांच्या डागांना बरे करण्यासाठी तुम्ही टि ट्रि तेल वापरू शकता. यामुळे स्ट्रेच मार्क्समुळे आलेले त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. टि ट्रि तेलाचा नियमित वापर केल्याने हट्टी डाग दिसण्यास प्रतिबंध होतो. त्याच्या नियमित वापराने हळूहळू स्ट्रेच मार्क्सही कमी दिसू लागतात.

स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी आणखी एक सोपा घरगुती उपाय आहे. अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये टि ट्रि ऑइलचे काही थेंब मिसळा आणि स्ट्रेच मार्क्सवर हलक्या हाताने मसाज करा. तुम्ही त्यात थोडे खोबरेल तेल किंवा व्हिटॅमिन ई तेल देखील घालू शकता. रात्रभर तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी धुवा.
 

Web Title: How To Get Rid of Stretch Marks : How to remove stretch marks permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.