Lokmat Sakhi >Beauty > व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर खाज, पुरळ, सूज येऊ नये म्हणून लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, त्वचेची जळजळ होईल कमी...

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर खाज, पुरळ, सूज येऊ नये म्हणून लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, त्वचेची जळजळ होईल कमी...

What to do if you get a rash after waxing ? : व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ, त्वचा लालसर होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. जर आपण देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर, घरगुती उपायांचा वापर करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2023 07:46 PM2023-10-07T19:46:17+5:302023-10-07T20:08:07+5:30

What to do if you get a rash after waxing ? : व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ, त्वचा लालसर होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. जर आपण देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर, घरगुती उपायांचा वापर करा...

How To Get Rid Of The Post-Waxing Rash, How to Treat and Prevent Bumps After Waxing | व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर खाज, पुरळ, सूज येऊ नये म्हणून लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, त्वचेची जळजळ होईल कमी...

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर खाज, पुरळ, सूज येऊ नये म्हणून लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, त्वचेची जळजळ होईल कमी...

आपल्या त्वचेवरील जास्तीचे केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग असे अनेक पर्याय निवडतो. आपल्यापैकी बहुतेक स्त्रिया दर महिन्याला आपल्या काही खास अवयवांवरील केस अवश्य काढून टाकतात. यामध्ये आयब्रो, हाता - पायांचे वॅक्सिंग, अंडरआर्म्स, अप्पर लिप्स यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. शरीरावरील हे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी आपण थ्रेडींग, वॅक्सिंग, शेव्हिंग अशा अनेक पर्यायांचा अवलंब करतो(How To Get Rid Of The Post-Waxing Rash?).

हात - पाय सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी बरेच महिला नियमित व्हॅक्सिंग करत असतात. व्हॅक्सिंगमध्ये देखील विविध प्रकार आहेत. जसे की, हॉट व्हॅक्स, कोल्ड व्हॅक्स, चॉकलेट व्हॅक्स आणि असे बरेच काही प्रकार (How to Treat and Prevent Bumps After Waxing) आहेत. शरीरावर येणारे नैर्सगिक केस काढताना प्रचंड वेदना (How To Treat Post-Waxing Rashes On Skin?) तर होतातच. सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांना व्हॅक्सिंगमुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांना व्हक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ, त्वचा लालसर होणे, खाज येणे अशा समस्या (4 WAYS TO GET RID OF AFTER-WAX BUMPS ON THE SKIN) उद्धभवतात. जर आपण देखील या समस्यांपासून त्रस्त असाल तर, घरगुती उपायांचा वापर करून आपण व्हॅक्सिंगनंतर त्वचेच्या होणाऱ्या या त्रासापासून त्वचेचा बचाव करु शकतो(Rashes After Waxing? What You Need to Know).
  

व्हॅक्सिंगनंतर रॅशेज का येतात ?

व्हॅक्सिंग करताना हाता - पायांवरील केस जोरात खेचले जातात. ज्यामुळे त्वचेवरील पोर्स ओपन होतात. ओपन पोर्समध्ये बॅक्टेरियांचा प्रवेश होतो, ज्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ येतात. काही लोकांना या समस्येपासून लगेचच आराम मिळतो. पण काही जणांना रॅशेजचा त्रास सहन करावा लागतो.

नवरात्रात सुंदर दिसावं म्हणून चेहऱ्याला ब्लिच करताय ? ६ गोष्टी विसरु नका, चेहरा व्हायचा खराब...

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर खाज, पुरळ, सूज किंवा जळजळ होऊ नये म्हणून नेमके काय करावे ? 

१. व्हॅक्सिंगनंतर त्वचेवर साबण लावणे टाळा :- 

व्हॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेवर साबणाचा वापर करु नका. हा सल्ला थ्रेडिंग केल्यानंतरही दिला जातो. थ्रेडिंग, व्हॅक्सिंग केल्यानंतर लगेच साबण वापरल्याने त्वचेवर पुरळ किंवा मुरुम येऊ शकतात. थ्रेडिंग, व्हॅक्सिंग केल्यानंतर किमान १० ते १२ तासांनंतरच साबण किंवा बॉडीवॉशचा वापर करावा. 

केसांची वाढ खुंटली ? करा ५ सोप्या स्टेप्समध्ये मसाज, केसांच्या वाढीत होईल मदत...

२. एलोवेरा जेलचा असा करा वापर :- 

एलोवेरा जेलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळते. ज्यामुळे पुरळ, जळजळ, खाज सुटणे, या समस्येपासून आराम मिळतो. व्हॅक्सिंगमुळे त्वचेवर आलेली सूज व जळजळ कोरफड जेलने कमी करता येईल. व्हॅक्सिंग केल्यानंतर कोरफड जेल त्वचेवर लावा. हे जेल रात्रभर स्किनवर लावून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याने स्किन स्वच्छ धुवा. यामुळे जळजळ थांबेल.

टोमॅटो-कॉफी-मध साखर; सेलिब्रिटी योग ट्रेनर अंशुका परवानी सांगते खास फेसस्क्रब, चेहऱ्यावर येईल ग्लो...

३. बर्फाचा असा करा वापर :- 

व्हॅक्सिंगनंतर जर त्वचेवर जळजळ होत असेल तर, त्यावर उपाय म्हणून आपण बर्फाचा उपयोग करू शकता. पुरळ व जळजळ कमी करण्यासाठी हलक्या हाताने बर्फाने मसाज करा. यासाठी एका कापडामध्ये बर्फ घ्या, त्यात आपण काकडी किंवा एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. व याने त्वचेवर मसाज करा. किंवा आईस - ट्रेमध्ये पाण्यासोबत एलोवेरा जेल किंवा काकडीचा रस मिक्स करून या बर्फाचा वापर करा.

४. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस :- 

व्हॅक्सिंगनंतर मुरूम व पुटकुळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी नारळाचे तेल व लिंबाचा रस आणि टी ट्री ऑइलमध्ये मिसळून लावावा. यासोबतच त्वचेला खाज येत असेल तर त्वचेवर बेबी ऑइल किंवा बेबी पावडर लावता येते.

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

Web Title: How To Get Rid Of The Post-Waxing Rash, How to Treat and Prevent Bumps After Waxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.