Lokmat Sakhi >Beauty > भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव

भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव

How To Get Rid Of Thin Eyebrows: भुवया खूपच पातळ झाल्या असतील आणि भुवयांचे केस गळायला लागले असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(home remedies for thick, broad and dark black eyebrows)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 14:00 IST2025-03-29T13:59:53+5:302025-03-29T14:00:42+5:30

How To Get Rid Of Thin Eyebrows: भुवया खूपच पातळ झाल्या असतील आणि भुवयांचे केस गळायला लागले असतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(home remedies for thick, broad and dark black eyebrows)

how to get rid of thin eyebrows, best remedies for thick eyebrows, how to get thick, broad and dark black eyebrows | भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव

भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव

Highlightsयासाठी एक मिश्रण तयार करा आणि ते तुमच्या भुवयांना २१ दिवस तरी अगदी नियमितपणे लावा.

आपल्या चेहऱ्याला रेखीवपणा आणि बोलकेपणा येतो तो डोळ्यांमुळे आणि डोळ्यांच्या वर असणाऱ्या काळ्याभोर भुवयांमुळे. भुवयांचा आकार थोडा जरी बदलला तरी त्याचा लगेचच आपल्या चेहऱ्यावर किती परिणाम दिसून येतो याचा अनुभव जवळपास प्रत्येक स्त्रीने कधी ना कधी घेतलेला असतो. कारण आयब्रोज करताना कधी कधी कमी- जास्त होतेच आणि त्याचा परिणाम थेट आपल्या चेहरेपट्टीवर दिसून येतो (how to get rid of thin eyebrows?). त्यामुळेच आपल्या भुवया छान दाट, काळ्याभोर, रेखीव असाव्या असं प्रत्येकीला वाटणं अगदी साहजिक आहे (best remedies for thick eyebrows). जर तुमच्या भुवया खूप पातळ असतील तर त्या दाट, काळ्याभोर करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home remedies for thick, broad and dark black eyebrows)

 

भुवया दाट, काळ्याभोर होण्यासाठी काय करावं?

भुवया खूप पातळ झाल्या असतील तर त्या पुन्हा दाट आणि काळ्याभोर होण्यासाठी काय करता येईल याची माहिती mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

Gudhi Padva 2025: गुढी उभारण्यापुर्वी ६ गोष्टींची तयारी करून ठेवा, ऐनवेळी धांदल उडणार नाही

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की यासाठी एक मिश्रण तयार करा आणि ते तुमच्या भुवयांना २१ दिवस तरी अगदी नियमितपणे लावा.

यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं व्हॅसलिन घ्या. त्यामध्ये रोजमेरी ऑईलचे १ ते २ थेंब, तेवढ्याच प्रमाणात खोबरेल तेल आणि कॅस्टर ऑईल घाला. या मिश्रणातच व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

 

यानंतर एखादे इअरबड घ्या आणि त्याच्या मदतीने हे मिश्रण भुवयांवर हळूवारपणे फिरवून लावा. गोलाकार पद्धतीने भुवयांना थोडा मसाज द्या.

श्रीखंडाला येईल केशराचा सुगंध आणि मस्त केशरी रंग, या पद्धतीने घाला केशर- श्रीखंड होईल चवदार

भुवयांच्या केसांची वाढ हळूवार असते. त्यामुळे हा उपाय केल्यावर लगेचच त्याचा परिणाम दिसून येणार नाही. म्हणूनच काही दिवस नियमितपणे हा उपाय करा. भुवयांच्या केसांची नक्कीच चांगली वाढ झाल्याचे जाणवेल. 


 

Web Title: how to get rid of thin eyebrows, best remedies for thick eyebrows, how to get thick, broad and dark black eyebrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.