त्वचेची पुरेशी काळजी घेण्यासाठी बऱ्याच जणींना वेळ मिळत नाही. शिवाय आहारातूनही त्वचेला योग्य पोषण मिळतेच असे नाही. कारण आहारपद्धतीमध्येही खूप बदल झाले आहेत. शिवाय हल्ली आपल्या त्वचेला तर धूर, धूळ, प्रदुषण, ऊन यांचाही नेहमीच सामना करावा लागतो. या सगळ्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्यामुळे मग कमी वयातच त्वचा प्रौढ, रापलेली दिसू लागते. चेहऱ्यावरची चमक तर कमी होतेच, पण कमी वयातच सुरकुत्याही येऊ लागतात. म्हणूनच अशा त्वचेमुळे आपण कमी वयातच वयस्कर दिसू नये यासाठी हा एक सोपा उपाय करायला अगदी आतापासूनच सुरुवात करा (home remedies for young, glowing skin). हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही (how to get rid of wrinkles?).. फक्त स्वत:साठी ५ मिनिटांचा वेळ मात्र नक्की काढा.(face yoga for reducing wrinkles)
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी उपाय
चेहऱा नेहमीसाठीच छान चमकदार, तजेलदार रहावा यासाठी काय उपाय करता येऊ शकतो याविषयीची माहिती humyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
भुवया खूपच पातळ झाल्या? १ सोपा उपाय करा- भुवया होतील जाड, काळ्याभोर आणि रेखीव
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. यानंतर जीभ थोडी गोलाकार वळवून तोंडाने श्वास घ्या. श्वास घेतल्यानंतर ओठ मिटून घ्या आणि गाल फुगवा. दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही नाकपुड्या बंद करा आणि चेहरा थोडा खाली करा.
जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत ही स्थिती टिकवून ठेवा आणि नंतर नाकाने श्वास सोडा.
कामाचा ताण वाढल्याने डोकं जड पडलं? 'हा' चहा प्या, ताण कमी होऊन रिलॅक्स वाटेल
हीच क्रिया एका नंतर एक याप्रमाणे ५ वेळा करावी. सकाळी ५ वेळा आणि रात्री ५ वेळा अशी तुमच्या सोयीने कधीही केली तरी चालते. हे एक प्रकारचे प्राणायाम आहे. यामुळे चेहऱ्यावर तर छान ग्लो येईलच पण आरोग्यालाही इतर अनेक लाभ होतील.