सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दूषित पाण्यामुळे लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागले आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपायांचा अवलंब करतात. (Hair care Tips) सतत डाय केल्यानं केसांचा पोत खराब होतो.अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेऊनही हवेतसे केस मिळत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला अशी आयुर्वेदिक पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवू शकता. केस धुताना वापरण्याच्या शॅम्पूमध्ये तुम्ही हर्ब्स वॉटर घालू शकता जेणेकरून तुमची केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. (How to get rid with white hairs)
साहित्य
- 2 टीस्पून चहाची पावडर
- 2 टीस्पून मेथी दाणे
- 2 टीस्पून आवळा पावडर
यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आता या पाण्यात सर्व वस्तू टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. पाणी शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. ते थंड झाल्यावर गाळून घ्या आणि काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.
केस धुताना थेट केसांना शॅम्पू लावू नका. एका भांड्यात काढा. आता त्यात अर्धा कप औषधी वनस्पती पाणी घाला आणि नंतर शॅम्पू करा. आठवड्यातून 2-3 वेळा केस शॅम्पू केल्यास हे पाणी वापरा. यामुळे तुमचे केस पांढरे ते काळे होऊ लागतील.
याशिवाय तु्म्ही पांढरे केस काळे करण्यासाठी एक कप तेलात एक कप कढीपत्ता उकळवा, तेल काळे होईपर्यंत. यानंतर हे तेल थंड करून गाळून साठवा. त्यानंतर आठवड्यातून 2-3 वेळा केसांमध्ये मसाज करा आणि रात्रभर केसांवर राहू द्या. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी भरपूर असते. हे केसांच्या छिद्रांमध्ये रंगद्रव्य मेलामाइन पुनर्संचयित करण्यात मदत करते आणि केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते.
दोन ते तीन चमचे कांद्याच्या रसात लिंबू घाला आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. तुमच्या टाळू आणि केसांना मसाज करा. तासाभरानंतर केस चांगले धुवा. कांद्याच्या रसामध्ये केस लवकर वाढवण्याचे गुणधर्म असतात, तसेच केस पांढरे होण्यापासूनही बचाव करतात. लिंबाच्या रसामुळे केसांना चमक तर येतेच शिवाय केसांना चांगला बाउन्सही येतो. हे एन्झाईम्स आणि कॅटालेझ देखील वाढवते, ज्यामुळे केसांचा रंग वाढतो.