Lokmat Sakhi >Beauty > केस कोरडे, पातळ झालेत? घरीच मिळवा कॅरेटिन ट्रिटमेंट्सारखी चमक; खर्च फक्त १० रूपये

केस कोरडे, पातळ झालेत? घरीच मिळवा कॅरेटिन ट्रिटमेंट्सारखी चमक; खर्च फक्त १० रूपये

How to Get Shiny Hair : जर तुम्ही केराटिन किंवा स्पा ट्रीटमेंटचा समावेश असलेली केसांची ट्रीटमेंट आधीच घेतली असेल तर हा रस लावणं टाळू नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:13 PM2022-08-02T12:13:08+5:302022-08-02T13:57:18+5:30

How to Get Shiny Hair : जर तुम्ही केराटिन किंवा स्पा ट्रीटमेंटचा समावेश असलेली केसांची ट्रीटमेंट आधीच घेतली असेल तर हा रस लावणं टाळू नका.

How to Get Shiny Hair : Use cucumber juice for healthy and shiny hair in just 10 rupees know how | केस कोरडे, पातळ झालेत? घरीच मिळवा कॅरेटिन ट्रिटमेंट्सारखी चमक; खर्च फक्त १० रूपये

केस कोरडे, पातळ झालेत? घरीच मिळवा कॅरेटिन ट्रिटमेंट्सारखी चमक; खर्च फक्त १० रूपये

केस लांब, काळेभोर असावेत असं प्रत्येकालाच वाटतं पण सध्याच्या वातावरणात चांगले केस मिळवणं खूप कठीण झालंय. केस कोरडे आणि निर्जीव असतील तर लूक खराब होतो. कोरड्या केसांची स्टाइल करणे सोयीचे नसते किंवा त्याचा लूक अपेक्षेप्रमाणे येत नाही. बरं, असे अनेक उपचार आहेत जे वापरून केसांचा कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो. (What makes hair shiny naturally)

केमिकल्स वापरण्यापेक्षा केसांमध्ये असे काहीतरी घालणे योग्य असते जे उत्पादनांच्या रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्यांचे संरक्षण करेल. तसेच केसांना येणारी चमक ही तात्पुरती नसावी, तर केस लांब, काळेभोर आणि दाट असेपर्यंत ती चमक टिकली पाहिजे. यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याचीही गरज नाही. फक्त दहा रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या केसांना नवीन लूक आणि चमक देऊ शकता. (1 Trick To Make Your Hair Look Super Shiny And Healthy)

काकडी तुम्ही अनेकदा सॅलडमध्ये खात असाल. काकडी चेहऱ्यावरही लावली जाते. जर तुम्हाला चमकदार केस हवे असतील  काकडीचा वापर केल्यास मदत होईल.  (Cucumber for Hair) काकडीत अनेक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या केसांसाठी उपयोग होऊ शकतो. 

चेहरा डल- काळपट वाटतो? कोथिंबीर वापरा आणि मिळवा ग्लोईंग, डागविरहीत त्वचा

असा करा वापर (How To Apply Cucumber For Hair and It's Benefits)

१) प्रथम, काकडी बारीक किसून घ्या आणि त्याचा रस पिळून घ्या, या रसात एलोवेरा जेल घाला, लिंबाचा रस, अॅपल सायडर व्हिनेगर देखील घाला, हे सर्व चमच्याने चांगले मिसळा, आता हा रस केसांना लावण्यासाठी तयार आहे. हा रस केसांच्या मुळांवर लावून मसाज करा. किमान तासभर केस धुवू नका. यानंतर कोमट पाण्याने केस हलक्या हातांनी धुवा. हा रस आठवड्यातून किमान दोनदा केसांना लावा.

२) काकडीचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. काकडी टाळूला हायड्रेट करते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ए, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी केसांचे पोषण करतात. यामुळे केसांना नवीन चमक येते आणि स्कॅल्पही निरोगी होते. केस देखील जास्त हायड्रेटेड राहतात, जे त्यांना मऊ ठेवण्यास मदत करतात.

काकडीचा वापर केसांवर करणं कधी टाळायचं?

काकडीचा रस केसांसाठी नेहमीच फायदेशीर असतो, परंतु अशा काही परिस्थिती असतात जेव्हा ते केसांसाठी फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक बनतो. जर तुम्ही केराटिन किंवा स्पा ट्रीटमेंटचा समावेश असलेली केसांची ट्रीटमेंट आधीच घेतली असेल तर हा रस लावणं टाळू नका. केसांची टाळू खूप कोरडी असेल तर या रसामुळे नुकसान होऊ शकते. कोरड्या केसांसाठी हा रस वापरताना खोबरेल तेलाचे काही थेंबही मिसळा. हा रस कोरड्या केसांना पोषण देईल.

Web Title: How to Get Shiny Hair : Use cucumber juice for healthy and shiny hair in just 10 rupees know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.