चूड़ी बजी है कहीं दूर छन छन छन छन...आजपर्यंत बांगड्यांवर अनेक गाणे तयार झाले आहेत. या गाण्यातून बांगड्यांचं सौंदर्य सांगण्यात आले आहे. बांगड्यांमुळे स्त्रियांचे हात खूप सुरेख दिसतात. महिला हातात बांगडी, नाकात नथनी, पायात जोडवी घातल्यावर खूप सुंदर दिसते. बांगड्यांशिवाय स्त्रियांचं सौंदर्य अपूर्ण आहे.
बाजरात अनेक प्रकारच्या डिझाईन व कलरफुल बांगड्या मिळतात. कालांतराने बांगड्या हातात बसत नाही. बांगड्या घट्ट होतात. व घालताना मनगटात तुटतात, ज्यामुळे हाताला दुखापत होते. त्यामुळे काही महिला बांगड्या घालणे टाळतात. अशा परिस्थितीत बांगड्या घालणे टाळण्यापेक्षा, ४ टिप्स फॉलो करा, या टिप्समुळे बांगड्या सहज हातात बसतील(How to Get Small Bangles Onto Your Wrist).
मॉइश्चरायझर किंवा तेल लावा
कधीकधी वजन वाढल्यामुळे हातात बांगड्या बसत नाही. अशावेळी बांगड्या घालण्यापूर्वी हातावर मॉइश्चरायझर किंवा खोबरेल तेल लावा. असे केल्याने बांगड्या सहज सरकतील, व हातात बसतील. त्याऐवजी आपण शॅम्पू किंवा साबणाचा वापर देखील करू शकता.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ
एलोवेरा जेलची मदत घ्या
बांगड्या सहज घालण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करा. यासाठी सर्वप्रथम हातावर जेल चांगले लावा. यानंतर बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने काही सेकंदात बांगड्या सहज हातात बसतील.
५ रुपयांची तुरटी केस आणि स्किनसाठी ठरते रामबाण उपाय, पाहा भन्नाट वापर व फायदे
हातमोजे घाला
कधी कधी बांगड्या हातात चढत नाही. बांगड्या घालताना हातमोजे घालून बांगडी घालण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आधी हातमोजे घाला, नंतर हातात बांगड्या फिरवत गोल पुढे सरकवा. अशाप्रकारे बांगडी अंगठ्याचे हाड ओलांडून मनगटापर्यंत सहज पोहचेल व बसेल.
पॉलिथिनचा वापर करा
अनेक वेळा घरामध्ये हातमोजे नसतात, अशावेळी आपण पॉलिथिनचा वापर करू शकता. यासाठी हातात पॉलिथिन घाला आणि त्यावर थोडे तेल लावा. यानंतरच बांगड्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न करा, या ट्रिकमुळे आपल्याला बांगड्यांचा त्रास होणार नाही.