Join us  

केस अत्यंत वाईट-कोरडे-झाडूसारखे दिसतात? केस कापू नका, करा ५ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 6:18 PM

How to Fix Dry Hair and Split Ends : How To Get Soft Hair Ends : How to get soft hair ends permanently : केस खालच्या बाजूने निर्जीव - कोरडे झालेत म्हणून वारंवार कापण्यापेक्षा करा हे ५ सोपे उपाय....

सुंदर, लांबसडक काळेभोर केस हा प्रत्येक स्त्रीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. केस सुंदर दिसावेत अशी प्रत्येकीची इच्छा असतेच. असे असले तरीही प्रत्येकीला केसांच्या बाबतीत काही ना काही तक्रार असतेच. कधी केस खूप पातळ असतात, तर कधी कोंडा असतो, कोणाचे केस कितीही काही केले तरी वाढत नाहीत तर कधी खूप फाटे फुटलेले असतात. आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमधील वेगवेगळ्या कारणांमुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. वाढते प्रदूषण आणि धूळ ही केसांच्या समस्या वाढण्याची मुख्य कारणे आहेत. केस सुंदर दिसून त्यामुळे आपल्या सौंदर्यात अधिक भर पडावी यासाठी आपण केसांची अधिकाधिक काळजी घेत असतो. केसांची कितीही काळजी घेतली तरी अनेक समस्यांपैकी एक कॉमन समस्या सगळ्यांना जाणवते ती म्हणजे केस खालच्या बाजूने खूपच निस्तेज, रुक्ष आणि कोरडे होणे. केसांची खालची टोकं अशी निर्जीव, कोरडी झाली की केसांचा संपूर्ण लूकच खराब होऊन जातो. अशा केसांची कोणती हेअर स्टाईल करायची किंवा मोकळे ठेवायचं म्हटलं तरी दिसायला ते चांगले दिसत नाही(How To Get Soft Hair Ends).

केसांना पुरेशी आर्द्रता मिळत नसेल तर खालच्या बाजुने केसांना फाटे (How to Fix Dry Hair and Split Ends) फुटतात. एकदा हे फाटे फुटायला सुरुवात झाली की केसांची वाढ कमी होते आणि खालच्या बाजुने केस कोरडे दिसायला लागतात. मग हौसेने वाढवलेले केस कापणे म्हणजेच ट्रीम करणे याशिवाय कोणताही पर्याय आपल्यापुढे उरत नाही. मग इच्छा नसतानाही केस कापावे लागतात. अशावेळी एवढ्या आवडीने वाढवलेले केस कापायचे म्हणजे अनेकींना नको  वाटते, यासाठीच जर केस खालच्या बाजूने अतिशय निस्तेज, रुक्ष, कोरडे झाले असतील आणि जर ते आपल्याला कापायचे नसतील तर आपण काही इतर उपायांचा वापर करु शकतो(How to get soft hair ends permanently).  

केस खालच्या बाजूने निस्तेज, रुक्ष, कोरडे होऊ नयेत म्हणून... 

१. बदाम तेल वापरा  :- खालच्या बाजूचे केस मऊ आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही नियमितपणे केसांना बदामाच्या तेलाची मालिश करू शकता. बदामाचे  तेल तुम्ही स्कॅल्प आणि केसांच्या टोकांना लावून मालिश करु शकता. बदामाच्या तेलामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे केसांच्या टोकाशी संबंधित अनेक  समस्या दूर करण्यास मदत करतात.

रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!

२. एलोवेरा जेल वापरा :- केसांची खालीच टोकं रुक्ष, निस्तेज किंवा खूपच ड्राय दिसत असतील तर आपण एलोवेरा जेलचा वापर करु शकता. एलोवेरा जेल स्कॅल्प आणि केसांच्या मुळांना लावून हलकेच मसाज करून घ्यावा. हे एलोवेरा जेल रात्रभर केसांना तसेच लावून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सौम्य किंवा हर्बल  शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय केल्याने एलोवेरा जेल केसांच्या मुळात चांगल्या पद्धतीने मुरते. परिणामी, केस खालच्या बाजूने रुक्ष, निस्तेज न होता मऊ, मुलायम होण्यास मदत मिळते. 

३. केस धुण्यासाठी नॉर्मल पाणी वापरा :- केस धुण्यासाठी नेहमी नॉर्मल पाण्याचा वापर करावा. केस धुताना कधीही खूप थंड किंवा कडक गरम पाण्याचा वापर करु नये. केस धुण्यासाठी खूप थंड किंवा कडक गरम पाण्याचा वापर केल्यास केसांचा पोत बिघडतो. केस अधिक रुक्ष, निस्तेज किंवा खूपच ड्राय होऊ नये म्हणून केस धुण्यासाठी नॉर्मल पाण्याचा वापर करावा. 

४. हिटिंग टूल्सचा वापर कमी करा :- स्ट्रेटनर, कर्लिंग, आयर्निंग आणि ब्लो ड्रायर यांसारख्या हिटिंग स्टायलिंग टूल्सचा जास्त वापर केल्याने केसांच्या टोकांना इजा पोहोचून त्यांचे नुकसान होऊ शकते. उष्णतेमुळे केसांचा ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस कोरडे होतात आणि तुटण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हिटिंग स्टायलिंग टूल्सचा वापर करायचाच असेल तर नेहमी हीट प्रोटेक्टेंट सिरम वापरा आणि स्टाइलिंग टूल्सचे टेम्परेचर कमी ठेवा.  

नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता... 

५. सिल्क किंवा सॅटिनच्या कापडापासून तयार केलेल्या उशा वापरा :- रात्री झोपताना तुमच्या केसांचे रक्षण करण्यासाठी सिल्क किंवा सॅटिनच्या कापडापासून तयार केलेल्या उश्यांचा वापर करावा. यामुळे उशीचे कव्हर आणि केसांचे मोठ्या प्रमाणात घर्षण होत नाही, ज्यामुळे केस तुटण्यापासून त्यांचा बचाव केला जातो. कापसाच्या उशांपेक्षा सिल्क किंवा सॅटिनच्या कापडापासून तयार केलेल्या उशा केसांवर अधिक सौम्य असतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी