Join us  

थंडीत ओठ फाटलेत-काळे पडले? आजीनं केलेला घरगुती लिप बाम लावा, गुलाबी-मऊ होतील ओठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 2:30 PM

How to Get Soft Pink Lips Naturally (Beet Root Lip Balm) : ओठांना मऊ ठेवण्यासाठी घरगुती लिपबाम बनवणं अगदी सोपं आहे.

थंडीच्या (Winter Care Tips) दिवसांत ओठ फाटणं (Dry Lips) हे फारच कॉमन आहे.  ओठ फाटू लागले की ते गुलाबी न राहता काळपट दिसू लागतात. (Home Remedies to Get Pink Lips) काळ्या ओठांमुळे चेहऱ्याचा लूकसुद्धा बिघडू शकतो. आपले ओठ मऊ राहावेत असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी काहीजण लिपबाम वापरतात तर कोणी लिप ग्लोज. (Homemade Lip Balm) ओठांना मऊ ठेवण्यासाठी घरगुती लिपबाम बनवणं अगदी सोपं आहे. सोशल मीडियावर आपली आजी या इंस्टाग्राम पेजवर घरगुती लिप बाम बनवण्याचा व्हिडिओ आजींची शेअर केला आहे. (Best Organic Beet Root Lip Balm Making Tips)

बीटाचा लिपबाम कसा बनवायचा? (How to Make Beet root Lip Balm at Home)

१) बीटाचा लिपबाम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बिटाची सालं काढून घ्या. साल काढल्यानंतर बीट चांगले बारीक किसून घ्या.  बीटाचा किस एका रूमालात ठेवून त्याचा सगळा रस काढून घ्या.  

२) बिटाच्या रसात १ चमचा खोबऱ्याचे तेल घाला. कढई गरम करून  त्यात बिटाचा रस घाला. बिटाचा रस व्यवस्थित शिजवून घ्या. चमच्याच्या साहाय्याने बीटरूटचा रस सतत ढवळत राहा नाहीतर जळण्याची शक्यता असते.

३) रस घट्ट झाल्यानंतर एका वाडग्यात  काढून घ्या,  त्यात मेण घालून वाफेवर वितळवून घ्या. वितळल्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये काढून लिपबाम फ्रिजमध्ये ठेवा. २ ते ३ तासांनी लिप बाम तयार झालेला असेल.  

४) तुम्ही हा लिप बाम ओठांना लावून ओठ मऊ ठेवू शकता. विशेष म्हणजे हा घरगुती लिप बाम तयार करताना यात कोणतंही रसायन वापरण्यात आलेलं नाही. 

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

5) ओठ चमकदार दिसण्यासाठी 1 चमचा बीटाचा रस घ्या. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा बीट आणि लिंबू या दोन्हीत व्हिटामीन सी असते. जे ओठांसाठी गुणकारी मानले जाते.

केस पिकलेत-डायची सवय नको? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय; केस होतील काळेभोर

अमेरिकन नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ  हेल्थच्या रिपोर्टनुसार  योग्य प्रमाणात  बीटाचा रस प्यायल्यास तब्येतीत सुधारणा होते. कच्चे बीट खाण्यापेक्षा ज्यूस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. बीटाच्या पाण्यात जास्त प्रमाणात फायबर्स, प्रोटीन्स  असतात आणि कमीत कमी कॅलरीज असतात ज्यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी