आयब्रोज चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. (Beauty Tips) आयब्रोजना तुम्ही पार्लरमध्ये जाऊन शेप देऊ शकता किंवा पेन्सिलने दाट दाखवू शकता. पण आयब्रोज पहिल्यापासूनच खूप पातळ असतील तर चेहरा खास दिसत नाही. कितीही मेकअप केला तरी आयब्रोज दाट दिसल्याशिवाय चेहरा आकर्षक उठून दिसत नाही. (Best Home Remedies For Thick Eyebrows) अनेक महिला पातळ आयब्रोज दाट दिसण्यासाठी ब्यूटी ट्रिटमेंट्सही घेतात. महागडे ब्युटी ट्रिटमेंटस घेण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करून आयब्रोजना दाट आणि सुंदर दाखवू शकता. (Eyebrow kase vadhave in marathi)
भुवयांना दाट आणि रेखिव करण्यासाठी उपाय
१) व्हिटामीन ई
बाजारात व्हिटामीन ई च्या कॅप्सूल तुम्हाला सहज मिळतील. व्हिटामीन ई एक पॉवरफुल एंटी ऑक्सिडेंट्स आहे जे केसांना होणारं नुकसान कमी करून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. यामुळे केस लांब आणि दाट होतात. ही कॅप्सूल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आयब्रोजच्या केसांना लावू शकता.
२) ऑलिव्ह ऑईल
हेअर ग्रोथसाठी ऑलिव्ह ऑईल एक उत्तम पर्याय आहे. ऑलिव्ह ऑईलचे ३ ते ४ थेंब कापसात बुडवून आयब्रोजवर ५ ते १० मिनिटांसाठी लावा, नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
थंडीत केस ड्राय झाले-खूप तुटतात? जावेद हबीबनं सुचवलेला १ उपाय करा, दाट-शायनी होतील केस
३) रोजमेरी तेल
लांब केसांसाठी रोजमेरी ऑईल लावण्याचा सल्ला दिला जातो. हेअर ग्रोथसाठी तुम्ही रोजमेरी तेलाचा वापर करू शकता. या तेलाने मसाज केल्यास आयब्रो दाट होण्यास मदत होईल. रात्रभर हे तेल आयब्रोजना राहू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा.
४) एलोवेरा
हेअर ग्रोथसाठी आणि हेअर फॉलिकल्स मजबूत बनवण्यासाठी एलोवेराचा वापर केला जातो. एलोवेरा जेल नारळाच्या तेलात मिसळून आयब्रोजना लावा. काही वेळाने व्यवस्थित धुवून घ्या. नियमित याचा वापर केल्याने आयब्रोज दाट दिसतील.
समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस
५) कांद्याचा रस
कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. पण आयब्रोजवर कांद्याचा रस लावल्यास जळजळ होऊ शकते. म्हणून कांद्याच्या रसात मध मिसळून बोटांच्या साहाय्याने आयब्रोजवर लावा. हे मिश्रण डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. ५ ते १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. या उपायांना आयब्रोजचे केस दाट, उठून दिसतील.