Join us  

ना पेस्ट - ना खर्च, १ रुपयाच्या शाम्पूने करा पेडीक्युअर, पायाचा काळेपणा होईल दूर; दिसतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2024 10:00 AM

How To Give a Pedicure To Our Feet At Home? by using Shampoo : पेडीक्युअर करण्याची सोपी ट्रिक, मिनिटात पाय चमकतील..

उन्हाळ्यात सूर्यप्रकाश आणि गरमीमुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात (Beauty Tips). मुख्य म्हणजे उन्हामुळे स्किन टॅन होते. शिवाय पाय, हात, कोपरे आणि मानही काळवंडते (Pedicure at Home). मुख्य म्हणजे पायावर स्लीपरचे आणि चप्पलेचे डाग पडतात. पायाचे टॅनिंग काढण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन अधिक खर्च करतो.

पण ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्यापेक्षा आपण घरातच शाम्पूच्या वापरानेही पेडीक्युअर करू शकता. या घरगुती उपायामुळे सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे टॅन झालेली स्किन साफ होईल, आणि काळवंडलेले पाय चमकतील. घरीच पेडीक्युअर करण्याची सोपी ट्रिक कोणती पाहूयात(How To Give a Pedicure To Our Feet At Home? by using Shampoo).

पेस्ट तयार न करता, घरीच करा पेडीक्यूअर

- पायाची टॅनिंग घालवण्यासाठी आपण शाम्पूचा वापर करू शकता. पाय आधी स्वच्छ धुवून घ्या. नंतर पायावर एक चमचा शाम्पू ओतून पसरवा.

- पायांना शाम्पू लावल्यानंतर त्यावर एक चमचा कॉफी घालून पसरवा.

मान-पाय-चेहराही काळवंडलाय? कोमट पाण्यात मिसळा ५ गोष्टी; एकदा वापरून दिसेल फरक

- कॉफी पसरवल्यानंतर, पायांवर एक चमचा बेकिंग सोडा शिंपडा, आणि लिंबाचा रस लावा.

- शेवटी लिंबाच्या सालीने पाय ५ ते ६ मिनिटांसाठी घासा. ५ मिनिटानंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्या.

बटाटे आणि लिंबू

पायांवर उन्हामुळे चपलांच्या टॅनिंगचे डाग? हातही काळवंडले? २ घरगुती उपाय-पाय चमकतील

पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण बटाटा आणि लिंबाचा देखील वापर करू शकता. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी यासह इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे पायाचा काळेपणा दूर होतो.

पायाचे टॅनिंग घालवण्यासाठी एका वाटीत बटाट्याचा रस घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. तयार पेस्ट पाय आणि हाताला लावा, आणि काही वेळासाठी मसाज करा. १५ मिनिटानंतर  थंड पाण्याने पाय धुवा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी