Join us  

महागडे पेडीक्युअर कशाला? २ रुपयाच्या शाम्पूत मिसळा ४ गोष्टी; १० मिनिटांत पाय दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2024 6:53 PM

How To Give Yourself A Quick Pedicure At Home; check instant cleaning tips : पाय काळपट पडले म्हणून सॉक्सने झाकू नका; घरातच करा पेडीक्युअर..

महिला त्यांच्या चेहऱ्यासोबत हात - पायांचीही काळजी घेतात (Beauty Tips). तर काही महिला चेहऱ्याची काळजी घेतात. पण हात, पाय, मान आणि कोपऱ्यांकडे दुर्लक्ष करतात (Cleaning Tips). काळपट पडलेली मान - हात स्वच्छ करण्यासाठी महिलावर्ग ब्यूटी पार्लरकडे धाव घेतात. पेडीक्युअर - मॅनिक्युअरवर बरेच पैसे खर्च करतात.

जर आपल्याला ब्यूटी पार्लरमध्ये खर्च करायचं नसेल तर, घरात शाम्पूचा वापर करून पेडीक्युअर करा. मिनिटात काळपट पडलेले पाय स्वच्छ होतील. टॅनिंग  आणि डागही दूर होतील. पण पेडीक्युअर करण्यासाठी शाम्पूचा वापर नेमका कसा करावा? यामुळे टॅनिंग दूर होऊ शकते का? पाहूयात(How To Give Yourself A Quick Pedicure At Home; check instant cleaning tips).

घरगुती पेडीक्युअर करण्यासाठी लागणारं साहित्य

शाम्पू

कोलेगेट

मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? शारीरिक - मानसिक तणाव कमी करण्यासाठी..

लिंबाचा रस

इनो

बेकिंग सोडा

अशा पद्धतीने करा पेडीक्युअर

सर्वात आधी शाम्पूचा पॅकेट कट करा. नंतर त्यात अर्धा चमचा कोलगेट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घालून चमच्याने सर्व मिक्स करा.

डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

साहित्य मिक्स केल्यानंतर पायावर ओतून २ मिनिटांसाठी स्क्रबरने घासा. १० मिनिटांसाठी तसेच ठेवा. १० मिनिटानंतर स्पंज किंवा पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्या. अशा प्रकारे घरगुती पद्धतीने पेडीक्युअर पाय स्वच्छ होतील. आपण या पद्धतीने पाय आठवड्यातून २ वेळा स्वच्छ करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी