आजकाल केस गळण्याची (Hair Fall) समस्या वाढत चालली आहे. जो तो व्यक्ती केस गळतीमुळे त्रस्त आहे. साधारण १० पैकी ८ लोकं केसांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. केस गळणे, केसात कोंडा, ड्रायनेस, निर्जीव केस अशा अनेक समस्यांमुळे केसांचा पोत बिघडतो. केसांच्या समस्यांमागे अनेक कारणे असू शकतात. जसे की, झोप न लागणे, तणाव, हार्मोनल असंतुलन, चुकीचा आहार यासह इतर कारणांमुळे केस गळण्याची समस्या वाढत जाते.
केस गळती ही समस्या कॉमन आहे, पण गळून केसांची पुन्हा वाढ होते नसेल तर, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे (Hair Care Tips). जर आपल्याला केस गळतीवर घरगुती उपाय करून पाहायचं असेल तर, फक्त खोबरेल तेलाचा वापर करू नका, त्यात ४ गोष्टी मिसळून अँटी हेअर फॉल ऑइल तयार करा. या घरगुती तेलामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील(How to Grow Hair Faster and Thicker Naturally).
अँटी हेअर फॉल ऑइल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य(Homemade Anti Hair fall Oil)
खोबरेल तेल
बारीक चिरलेला कांदा
कडीपत्ता
कलौंजी
७ फूट लांब केस असलेल्या महिलेने फक्त ४ घरगुती गोष्टी वापरत राखली केसांची निगा
मेथी दाणे
अँटी हेअर फॉल ऑइल तयार करण्याची कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप खोबरेल तेल घ्या. आपण आपल्या केसांच्या लांबीनुसारही खोबरेल तेल घेऊ शकता. बाऊल गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात कडीपत्त्याची पानं, एक चमचा कलौंजी आणि एक चमचा मेथी दाणे घालून ५ मिनिटांसाठी भाजून घ्या.
५ मिनिटानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर चहाच्या गाळणीने गाळून तेल एका बाऊलमध्ये काढून घ्या. आठवड्यातून तीन वेळा या तेलाचा वापर आपण करू शकता. यासाठी रात्रीच्या वेळेस तेल लावा. सकाळी शाम्पूने केस धुवून घ्या.
केसांवर अँटी हेअर फॉल ऑइल लावण्याचे फायदे
खोबरेल तेल लावल्याने केस आणि त्वचेला पोषण मिळते. याशिवाय कांद्यामध्ये असे अनेक विशेष गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. त्यातील सल्फर केसांसाठी फायदेशीर ठरते. कडीपत्ता व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे केस अकाली पांढरे होत नाही.
कलौंजीमध्ये ओमेगा -३ आणि ओमेगा -६ फॅटी ऍसिड्स असतात. जे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरते. त्याचबरोबर मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले प्रोटीन, लेसिथिन आणि निकोटीनिक अॅसिड केसांच्या वाढीस मदत करतात.