केस वाढवण्यासाठी शॅम्पू तेल बदलण्यापासून ते महागडा हेअर स्पा करेपर्यंत अनेक गोष्टी महिला करतात पण या उपायांचा फारसा उपयोग दिसून येत नाही. (Hair Growth Tips) केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही घरच्याघरी काही सोपे उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला खर्चही लागणार नाही आणि केसांची नैसर्गिकरित्या वाढ होईल. (Home remedies for hair growth)
केस खराब होऊ नयेत म्हणून वेळीच काळजी घेतलेलं बरं असतं कारण एकदा गळू लागले की केस गळणं काही थांबत नाही. केस गळू नयेत म्हणून बाहेर पडताना केस कव्हर करा. केसांवर केमिकल्सचा वापर करू नका. स्ट्रेटनिंग मशिन, ड्रायर यांसारख्या हिटींग टुल्सचाही वापर करू नका. यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि नवीन केसांची वाढ होत नाही.
केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय कसा करावा?
घरच्याघरी केस गळणं थांबवण्यासाठी तुम्हाला एलोवेरा, आल्याचा रस आणि एरंडेल तेल या पदार्थांची आवश्यकता असेल. हा सोपा उपाय करण्याासाठी सगळ्यात आधी आलं किसून घ्या आल्याच रस काढून तो एका भांड्यात गाळून घ्या. त्यात चमचाभर एरंडेल तेल, १ चमचा नारळाचे तेल आणि १ चमचा एलोवेरा जेल घाला. हाताच्या किंवा ब्रशच्या साहाय्याने हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस कायम सुंदर, दाट दिसतील.
हे तेल किती वेळा वापरावे?
आठवड्यातून तीन वेळा हे तेल लावा, कमीतकमी 3 महिने वापरा, उत्तम परिणामांसाठी, या तेलाच्या सतत वापराने तुमचे केस गळणे थांबेल, केस लवकर वाढू लागतील, नवीन केस वाढू लागतील. एलोवेरात असे काही गुणधर्म असतात ते केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरतात.
हाडांना लोखंडासारखं बळकट बनतात हे ८ पदार्थ; रोज खा-कॅल्शियम भरपूर वाढेल, फिट राहाल
अनेक केसांच्या उत्पादनांमध्ये एलोवेराचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे आल्याचा रसही केसांच्या मुळांना एक्टिव्ह करून नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. एरंडेल तेलामुळे केसांमध्ये कोरडेपणा येत नाही. केसांना योग्य पोषण मिळाल्याने केस पटापट वाढतात.