Lokmat Sakhi >Beauty > How to grow hair faster : केस खूप गळतात, वाढ अजिबात होत नाहीये? तुपाचा 'असा' वापरा करून मिळवा लांबसडक केस

How to grow hair faster : केस खूप गळतात, वाढ अजिबात होत नाहीये? तुपाचा 'असा' वापरा करून मिळवा लांबसडक केस

How to grow hair faster : रासायनिक  उत्पादने आणि हिटींग टूल्सचा वापर केल्याने केस खूप लवकर खडबडीत आणि कोरडे होऊ शकतात. यामुळे केसांचा पोतही खराब दिसतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:21 PM2022-02-03T13:21:28+5:302022-02-03T17:38:28+5:30

How to grow hair faster : रासायनिक  उत्पादने आणि हिटींग टूल्सचा वापर केल्याने केस खूप लवकर खडबडीत आणि कोरडे होऊ शकतात. यामुळे केसांचा पोतही खराब दिसतो. 

How to grow hair faster : Ayurvedic expert shares benefits of desi ghee for hair health | How to grow hair faster : केस खूप गळतात, वाढ अजिबात होत नाहीये? तुपाचा 'असा' वापरा करून मिळवा लांबसडक केस

How to grow hair faster : केस खूप गळतात, वाढ अजिबात होत नाहीये? तुपाचा 'असा' वापरा करून मिळवा लांबसडक केस

केस निरोगी ठेवण्यासाठी बहुतेक लोक हेअर केअर (Hair Care Tips) रूटीन ठरवतात.  ज्यामध्ये मसाज करण्यापासून केसांना पोषण देण्यापर्यंतचे काम केले जाते. अनेक लोक टाळूच्या मालिशसाठी वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरतात. पण तेलाऐवजी गावठी तूपही केसांवर वापरू शकता. केसांना तूप लावण्याची प्रथा खूप जुनी आहे. आजही बरेच लोक केस निरोगी ठेवण्यासाठी ही जुनी पद्धत वापरत असतात. शुद्ध देशी तूप मिळणे खूप अवघड असल्याने अनेक वेळा लोक याचा वापर करत नाहीत. (Hair Growth Tips) 

मात्र, जर तुम्ही घरी तूप बनवले तर तुम्ही ते वापरू शकता. अलीकडेच आयुर्वेदिक तज्ज्ञ निकिता कोहलीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि केसांना देसी तूप लावण्याचे फायदे शेअर केले. (Ayurvedic expert shares benefits of desi ghee for hair health) केमिकलयुक्त तेलाऐवजी तूप केसांना लावल्यास केसांची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. (How to Grow hairs faster Naturally)

अनेकांना केसांच्या वाढीची समस्या आहे, ज्यासाठी स्त्रिया अनेक केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतात. अशा परिस्थितीत तुम्ही देशी तूप वापरून पाहू शकता. यासाठी आधी थोडे गरम करून नंतर मसाज करा. हे केवळ केसांची स्थितीच नाही तर टाळूमध्ये रक्त परिसंचरण देखील उत्तेजित करेल. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकते, केस दाट आणि लांब बनवू शकते. (Ways to Help Your Hair Grow Faster and Stronger)
 

रासायनिक  उत्पादने आणि हिटींग टूल्सचा वापर केल्याने केस खूप लवकर खडबडीत आणि कोरडे होऊ शकतात. यामुळे केसांचा पोतही खराब दिसतो.  जर तुमचे केस कडक आणि कोरडे असतील तर देशी तूप वापरा. देसी तूप थेट केसांना आणि टाळूवर लावल्याने केसांचा पोत सुधारतो. याशिवाय केस अधिक गुळगुळीत आणि चमकदार दिसतात.

केसांनाही वेळोवेळी डीप कंडिशनिंगची गरज असते. निरोगी केसांची निगा राखण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. यासाठी तूप देखील वापरू शकता. तज्ज्ञांच्या मते, केसांना तुपाने मसाज करा आणि नंतर रात्रभर राहू द्या. उशा किंवा बेडशीटवरील डाग टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी केसांना शॉवर कॅप लावा.

Web Title: How to grow hair faster : Ayurvedic expert shares benefits of desi ghee for hair health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.