Join us  

१५ दिवसात भराभर वाढतील केस ; स्वयंपाकघरातील १ पदार्थ वापरा, केस गळणं होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 9:13 AM

How to Grow Hair Faster : मेथीचा हेअर पॅक केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. ते बनवण्यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्यात अंडी घालून तयार करा.

केस गळण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच उद्भवते. केस गळणं कमी करण्यासाठी अनेक शॅम्पू, हेअर ऑईल्स उपलब्ध आहेत पण त्यावर पैसे खर्च करूनही हवातसा बदल दिसत नाही. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी केसांवर काही घरगुती उपाय केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होईल. (Benefits of Fenugreek Seeds For Hair) केसांच्या वाढीसाठी हा सर्वोत्तम जलद उपाय आहे.  मेथीचे दाणे पोषक तत्वांनी भरलेले असतात. जे केवळ केसांच्या वाढीस प्रोत्साहन देत नाही तर सुधारते. नियमितपणे वापरल्यास केसांचा पोत सुधारतो. (How to use fenugreek for hair growth)

मेथीचे केसांना फायदे (How to use fenugreek for hair growth)

१) केसांच्या वाढीसाठी सतत तेल लावणे खूप महत्वाचे आहे. अशावेळी तुम्ही मेथीचे दाणे आणि खोबरेल तेल घालून केसांचे तेल बनवू शकता. यासाठी मेथी खोबरेल तेलात बिया लाल होईपर्यंत उकळा. नंतर तेल थोडे थंड झाल्यावर ते टाळूला लावा. हे तुमचे रक्त परिसंचरण सुधारून तुमच्या केसांची वाढ वाढवेल. (What to Know About Fenugreek for Hair Growth)

रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल; वापरा पुदीना अन् आल्याचा खास फॉर्म्यूला

२) केसांना वाढण्यासाठी प्रोटीनची गरज असते. तुम्ही मेथीच्या दाण्यांपासून सीरम तयार करून केसांना लावू शकता. यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर त्यात मोहरीचे तेल किंवा जोजोबा तेल मिसळून ठेवावे. आता हे सीरम केसांना लावा.

३) मेथीचा हेअर पॅक केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. ते बनवण्यासाठी मेथीचे दाणे बारीक करून त्यात अंडी घालून तयार करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात दहीही घालू शकता. त्यानंतर हा हेअर पॅक केसांना लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर आपले केस कोमट पाण्याने धुवा आणि नंतर शॅम्पू करा.

वाढलेला पोटाचा घेर पटापट होईल कमी; जेवल्यानंतर १५ मिनिटं हे काम करा, स्लिम दिसाल

४) मेथीची पेस्ट केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या वापरामुळे तुमचे केस दाट दिसू शकतात. ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मेथीचे दाणे भिजवून रात्रभर ठेवावे लागतील. मेथीचे दाणे सकाळी बारीक करून केसांना लावा. नियमित हा उपाय केल्यास केस वाढवण्यास मदत होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स