केस गळायला सुरूवात झाली की महिलांचे पाय पार्लरच्या दिशेनं वळतात. हेअर स्पा, केरेटीन ट्रिटमेंट करून केसांवर चांगला परीणाम होईल असं त्यांना वाटतं. (The benefits of fennel seeds for your hair) पण पार्लर ट्रिटमेंट्समध्ये अनेकदा केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो. (How to stop hair fall) या उत्पादनांचा परिणाम लॉन्ग टर्मसाठी नसून तात्पुरता असतो. (Hair Fall Solution)
अशावेळी कमी खर्चात घरगुती उपाय समस्या सोडवू शकतात. किचनमधील एक पदार्थ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यामुळे केस काळे, दाट आणि मऊ होण्यास मदत होईल. यात एंटीऑक्सिडेंट्स आणि फायटोन्युट्रिएंट्स असतात. जे केसाच्या समस्यांपासून वाचवतात. (Hair care tips fennel benefits)
बडीशेपेचं तेल कसं बनवायचं?
केसांना सुंदर बनवण्यासाठी बडिशेपेच्या तेलाचा वापर करा. अर्धा कप बडीशेप आणि १ कप नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये घालून एकत्र करा. तेलात बडिशेप मिसळ्यानंतर उकळ येईपर्यंत गॅसवर ठेवा. यानंतर तेल थंड करून घ्या आणि एका बरणीत स्टोअर करा.
बडीशेपेच्या तेलाचे फायदे
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि केसांची चमक परत येण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. बडीशेपेचे तेल एंटी ऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियांना नष्ट करण्यासाठी महत्वपूर्ण असतात. यामुळे हेअर स्काल्प हेल्दी राहतो आणि केसांनाही पोषण मिळतं.
हेअर ग्रोथ
फ्रि रेडिकल्समुळे केसांचं नुकसान होतं. यामुळे केस उगवणं कठीण होतं. फ्री रेडिकल्सशी लढण्यासाठी केसांना एंटीऑक्सिडंट्सची गरज असते. बडिशेपेत असलेले आयर्न, कॉपर, फॉलेट, नियासिन आणि एसिड्स केसांची वाढ होण्यास मदत करतात.
पोट साफ नसतं, मल बाहेर निघत नाही; जेवताना चमचाभर तूपाचा हा उपाय करा, पोट होईल साफ
केस मजबूत होतात
कमकुवत आणि पातळ केस अधिक वेळा तुटतात. या तेलात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी आढळते. हे सर्व केसांच्या छिद्रांना पोषण देण्याचे काम करतात. यामुळे केस मजबूत होतात आणि तुटणे आणि गळणे थांबते.
पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर
स्काल्प स्वच्छ ठेवा
केसांना दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी स्काल्पची काळजी घेणं गरजेचं आहे. बडिशेपचे तेल लावल्यानं केसांबरोबरच स्काल्पही स्वच्छ राहतो. यामुळे केसांमध्ये बॅक्टेरियाज तयार होत नाही आणि केस सुंदर, मजबूत राहण्यास मदत होते.