खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रोटीन्सचा अभाव यांमुळे केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (Hair Care Tips) एकदा केस गळायला लागले की २ ते ३ महिने केस गळणं थांबायचं नाव घेत नाही. काहीजण जास्त स्ट्रेस घेतात. स्ट्रेसमुळे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. (How to grow hair faster)परिणामी केसांची नीट वाढ होत नाही.
केमिकलयुक्त शॅम्पू, तेलांच्या वापरानं कधी फरक जाणवतो तर कधी अजिबात फरक जाणवत नाही. स्काल्प कोरडा पडल्यानं केसही कोरडे होतात, कोंडा वाढतो आणि केस जास्त तुटायला लागतात. काही घरगुती उपाय तुमची ही समस्या सोडवण्यास मदत करतील. (Hair Growth Tips)
केस गळणं कमी करण्यसााठी सोपा घरगुती उपाय
सगळ्यात आधी १ ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यात बिटाचे तुकडे, लिंबू घालून २ ते ३ मिनिटं उकळून घ्या. नंतर गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्या. या पाण्यात माईल्ड शॅम्पू २ चमचे घालून एकत्र करा. व्यवस्थित एकजीव करून या शॅम्पू केसांना लावा आणि या शॅम्पूनं केस धुवा.
१) केस खूपच गळत असतील तर तर बीटरूटचा रस केसांच्या मुळांना लावा. हेअर मास्क बनवण्यासाठी बीटरूटचा रस कॉफीमध्ये मिसळून लावा. तुम्ही हेअर कंडिशनर म्हणूनही वापरू शकता.
२) ओठांसाठीही बीट फायदेशीर आहे. बीटाचा रस रोज ओठांवर लावल्याने त्यांचा रंग गुलाबी होऊ लागतो. याशिवाय बीटाच्या रसात साखर मिसळूनही ओठ स्क्रब करू शकता.
फक्त ७ दिवसात केसांची चांगली होईल वाढ; गळणंही थांबेल, रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय
३) बीटरूट आणि टोमॅटोचा अर्धा-अर्धा रस मिसळा आणि नंतर चेहऱ्याला लावा. ते कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. यामुळे व्हाईटहेड्ससोबतच ब्लॅकहेड्सही दूर होतात.
४) कोंडा दूर करण्यासाठी बीटरूटच्या रसात थोडेसे व्हिनेगर किंवा कडुलिंबाचे पाणी मिसळा आणि केसांना लावा. त्यानंतर काही वेळाने केस शॅम्पूने धुवा. यामुळे खाज आणि कोंडापासून आराम मिळेल आणि केस मऊ आणि सुंदर दिसतील.