सुंदर केस मिळविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो.(Hair Care Tips) विशेषत: मुली केसांना चमक आणण्यासाठी आणि त्यांना निरोगी करण्यासाठी अनेक मार्ग वापरतात. पण खरोखरच सुंदर केस म्हणजे चमकदार, लवचिक असतात. असे केस फार तेलकट किंवा कोरडेही नसतात. (Shahnaz husain tips to add volume in hair) केसांची काळजी घेणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. (How to get long hairs naturally)
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना केसांची हवी तशी काळजी घेता येत नाही. परिणामी केस गळणं, केस पांढरे होणं या समस्या सुरू होतात. योग्य काळजी घेऊन तुम्ही केस दाट करू शकता. सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसैन यांनी दाट केसांसाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (How get long and string hairs faster)
1) चांगल्या केसांसाठी काय खायचं? (Foods For good Hair Growth)
जर तुम्हाला तुमचे केस दाट हवेत असतील तर आहाराची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केसांना खरेतर रक्तप्रवाहातील पोषक तत्वांमुळे पोषण मिळते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आणि व्हॉल्यूम वाढवण्यासाठी पोषण आणि चांगले रक्त परिसंचरण दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या आहारात दररोज एक लहान वाटी कडधान्यांचा समावेश करा, कारण त्यात अमीनो ऍसिड असतात, जे केसांसाठी सर्वात महत्वाचे पोषक असतात.
2) केसांना कंडिशनिंग करा
हेअर कंडिशनिंग हा केसांना व्हॉल्यूम वाढवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे ज्याद्वारे आपण केसांचे स्वरूप सुधारू शकतो. कंडिशनिंगमुळे केसांचे पोषण होण्यासही मदत होते, त्यामुळे ते दाट दिसतात. कंडिशनर प्रामुख्याने केसांना चमकदार बनवते. रसायनांच्या प्रभावामुळे केसांचे नुकसान होऊ शकते जे कंडिशनिंगद्वारे दुरुस्त केले जाऊ शकते. कंडिशनिंगमुळे केसांचा पोत आणि लुक सुधारण्यास मदत होते. केस धुतल्यानंतर कंडिशनर केसांना व्हॉल्यूम देते म्हणजेच केस दाट दिसतात.
३) केसांमध्ये हिनाचा वापर
केस दाट करण्यासाठी मेंदी एक शक्तिशाली नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. त्यामुळे केसांना जाडी, आकारमान आणि ताकद मिळते. पण केसांना मेंदी लावण्यापूर्वी तुम्ही चांगल्या दर्जाची मेंदी पावडर वापरल्याची खात्री करा. मेहंदी केसांमध्ये लालसर तपकिरी रंग सोडते.
मेहेंदी केसांना पूर्णपणे काळे करत नाही पण नैसर्गिक लूक, हायलाईट देते. कलर केलेल्या केसांना कधीही मेहेंदी लावू नये त्यामुळे केसांचा रंग खराब होऊ शकतो. मेहेंदी एक शक्तीशाली प्राकृतिक क्लिंजरसुद्धा आहे. मेहेंदी केसांवर एखाद्या कंडीशनरप्रमाणे काम करते. केसांना मेहेंदी लावण्यासाठी सगळ्यात आधी मेहेंदी पावडरमध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि केसांवर लावा. अर्धा तास केसांवर तसेच ठेवून नंतर केस धुवून घ्या
४) अंड आणि एरंडेल तेल
कोरड्या केसांना व्हॉल्यूम आणि चमक देण्यासाठी, दोन चमचे एरंडेल तेल, एक लिंबाचा रस आणि एक चमचे ग्लिसरीन घ्या, या सर्व घटकांसह एक अंडे घाला. हे घटक चांगले मिसळा. हे मिश्रण टाळूवर मसाज करा आणि केसांनाही लावा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा.
५) मूग डाळीचा वापर
कोरडे, तेलकट केस दाट करण्यासाठी एक कप मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी घालून बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा. केसांचे वेगवेगळे भाग करा आणि डाळीची पेस्ट केसांमध्ये अशा प्रकारे लावा की संपूर्ण केस झाकले जातील. ही पेस्ट केसांवर अर्धा तास राहू द्या आणि साध्या पाण्याने केस धुवा.