केसांची गळती (Hair Fall Problem) ही सध्याच्या स्थितीतील कॉमन स्थिती आहे. (Hair Fall Solution) एकदा केस गळायला लागले की कायम गळत राहतात. विंचरताना तुटतात, केस धुताना गळतात आणि घरभर पसरतात (How to use methi on hairs) केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकता. मेथी शरीरासाठी पौष्टीक ठरते त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठीही फायदेशीर ठरते. मेथीचे दाणे केस दाट होण्यास आणि केस वाढवण्यास उपयोगी ठरतात. (How to Grow Hair Quickly)
केसांवर मेथीच्या दाण्यांचा वापर कसा करावा? (How to use fenugreek on Hairs)
1) केसांवर मेथी लावण्यासाठी सगळ्यात आधी मेथीच्या दाण्यांची पावडर बनवून घ्या. ही पावडर गाळून एका डब्यात भरा त्यात नारळाचे तेल घाला.
2) नारळाचं तेल घातल्यानंतर एकजीव करून पुन्हा हे तेल गाळून घ्या. जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा साधे तेल लावण्याऐवजी हे मेथीचे तेल लावा आणि या तेलाने मसाज करा.
3) सकाळी उठल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून टाका. यामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केस गळणार नाहीत. १५ ते २० दिवसांत या उपायाने केस काळेभोर होण्यास मदत होईल.
मेथीत व्हिटामीन्स आणि प्रोटिन्स असतात. जे केसांना हेल्दी आणि लांब बनवण्यास मदत करतात याव्यतिरिक्त यात आयर्नचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि केस आतून मजबूत होतात. मेथी आणि दह्याचा पॅक केसांसाठी फायदेशीर ठरतो.
विंचरताना केसांचा गुच्छा हातात येतो? रात्री झोपताना ५ गोष्टी करणं टाळा, दाट-लांब होतील केस
सगळ्यात आधी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. नंतर मेथीच्या दाण्यांचे पाणी काढून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट दह्यात मिसळून केसांना लावा. हा पॅक केसांना दाट बनवण्याचे काम करेल. दुसरी पद्धत अशी की, मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मेथीचे दाणे पाण्यातून काढून याची पेस्ट बनवून घ्या. यात मध मिसळून केसांना लावा ३० ते ४० मिनिटं केसांना लावून ठेवा नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.